मीठ खाली पडणं: धनहानीचा संकेत
वास्तुशास्त्रामध्ये मीठ हे चंद्राचे प्रतीक मानले जाते, स्वयंपाकघरात मीठ हातातून सतत खाली पडल्यानं घरातील लोकांना मानसिक ताण येतो, कोणती ना कोणती चिंता लागून राहते. पैशांची चणचण होते. वारंवार मीठ खाली पडत असेल, तर लक्ष्मी माता अशा घरावरून नाराज होऊन जाऊ शकते. मीठ खाली पडल्यास ते त्वरित स्वच्छ करावे. त्यानंतर थोडे मीठ गंगाजलात (गंगा नदीच्या पाण्यात) मिसळून संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
advertisement
तेल खाली साडणं: अपघाताचा संकेत
स्वयंपाकघरात सतत तेल खाली साडणं खूप अशुभ मानलं जातं. वास्तुनुसार तेल शनी ग्रहाचे प्रतीक आहे आणि ते खाली पडल्यास घरातल्या एखाद्याला दुखापत होऊ शकते किंवा वाहनाचा अपघात होऊ शकतो, असा संकेत मिळतो. घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याचाही तो संकेत असू शकतो.
हळद खाली पडणं: मानहानीचा धोका
स्वयंपाकघरात हळद सांडणं हे समाजात अपमान, मानहानी किंवा सन्मान कमी होण्याचा अशुभ संकेत मानला जातो, कारण वास्तुशास्त्रामध्ये हळद गुरू ग्रह आणि शुभतेचे प्रतीक आहे. खाली पडलेली हळद गोळा करून ती पूजेत वापरावी आणि थोडी हळद दान करावी, जेणेकरून गुरूची कृपा कायम राहील आणि सन्मान सुरक्षित राहील.
दूध उतू जाऊन साडणं -
स्वयंपाकघरात दूध उकळताना ते उतू जाऊन खाली साडलं, तर ते अशुभ मानलं जाते. दूध लक्ष्मी माता आणि चंद्राचे प्रतीक आहे. असे झाल्यास पैशांची नासाडी होते आणि मानसिक अशांती निर्माण होते. घरातील सकारात्मक ऊर्जा संपू लागते. यासाठी खाली पडलेले दूध लगेच पुसून घ्यावे. असं सतत घडणं अशुभ मानलं जातं.
तांदूळ खाली पडणं - स्वयंपाकघरात सतत तांदूळ हातून सांडत असेल तर घरात भांडणं होणं, कुटुंबात तणाव निर्माण होणं, अशा गोष्टींचा संकेत मिळतो. घरात धान्याची कमतरताही भासू शकते. असे झाल्याने अन्नपूर्णा माता नाराज होऊ शकतात. खाली पडलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत आणि घरातील तांदूळ गरजूंना दान करावेत.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
