वास्तुशास्त्रानुसार कॉर्नरचं घर दोन दिशांनी खुलं असतं. याचा अर्थ असा की ऊर्जा तिथून जास्त वेगाने येते आणि जाते. जर दिशा योग्य असतील तर याचा फायदा होतो, पण जर प्रवेश दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडून असेल, तर हीच ऊर्जा नुकसान करू लागते. कॉर्नरवर खांब किंवा जड वस्तू असेल तर ताण अधिक वाढतो, ज्याचा परिणाम घरातील लोकांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होऊ शकतो.
advertisement
ज्या घरांमध्ये नैऋत्य (साऊथ-वेस्ट) दार असल्यास ते जास्त करून बंद ठेवावं. कारण ही दिशा जितकी कमी उघडली जाईल तितकं चांगलं मानलं जातं. मात्र, दक्षिण-दक्षिण पश्चिम प्रवेशद्वाराचा वापर जर रोज होत असेल, तर अडचणी तिथूनच सुरू होतात. या दिशेच्या वापरामुळे कर्ज वाढणे, पैसे अडकणे, कामात अडचणी आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या वारंवार समोर येतात. उत्तर (नॉर्थ) दिशेला प्रवेशद्वार असणं सकारात्मक आहे, पण त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा इतर चुकीची प्रवेशद्वारे बंद असतील.
असं घर राहण्यायोग्य आहे का?
जर तुम्ही 15-20 वर्षं अशा कॉर्नरच्या घरात राहण्याचा विचार करत असाल, तर वास्तूनुसार असं घर टाळणंच श्रेयस्कर मानलं जातं. पण जर काही कारणास्तव 3, 5 किंवा 7 वर्षांसाठी राहायचं असेल, तर योग्य उपायांसह राहता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम ही दोन्ही प्रवेशद्वारे पूर्णपणे बंद ठेवावीत. पश्चिम किंवा पश्चिम-दक्षिण पश्चिमकडून प्रवेश असेल तर तो बऱ्याच अंशी संतुलन राखण्यास मदत करतो.
नक्कीच शुभ संकेत समजावेत! पहाटेच्या वेळी स्वप्नात अशा गोष्टी भाग्यवानांना दिसतात
वास्तु उपायांनी किती दिलासा मिळू शकतो?
कॉर्नरची प्रॉपर्टी पूर्णपणे दोषमुक्त करणं कठीण असतं, पण नुकसान नक्कीच कमी करता येतं. योग्य दिशांचा वापर, चुकीचे गेट बंद ठेवणं आणि कोपऱ्यावर जडपणा वाढवणं या गोष्टींमुळे वाईट परिणाम कमी होतात. तरीही, जर कर्जाची समस्या सतत सतावत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
कॉर्नरचं घर कधी टाळलेलं चांगलं?
जर घरात दक्षिण-दक्षिण पश्चिम प्रवेशद्वार सक्रिय असेल, कोपऱ्यावर विजेचा खांब असेल आणि सोबतच आर्थिक समस्या सुरू असतील, तर असं घर बदलण्याचा विचार करणं शहाणपणाचं ठरतं. अनेकदा जागेपेक्षा दिशा जास्त नुकसान पोहचवतात.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
