झाडू योग्य दिशेला ठेवल्यास, तिथं लक्ष्मीचा वास असतो आणि घरात सुख-शांती टिकून राहते, असं म्हणतात. चुकीच्या दिशेला ठेवलेल्या झाडूमुळे घराची प्रगती थांबते आणि नकळतपणे नकारात्मकता वाढू शकते. म्हणून, झाडू ठेवण्याची योग्य पद्धत आणि दिशा माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि कोणताही वास्तुदोष निर्माण होणार नाही.
जाणून घेऊया झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे, कोणत्या ठिकाणी तो ठेवायचा नाही आणि कोणत्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या घरातील समृद्धी आणि आनंदाचे वातावरण वाढवू शकता.
advertisement
झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे?
वास्तुतज्ञांनुसार, झाडू घराच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) किंवा पश्चिम दिशेला ठेवणं सर्वात शुभ मानलं जातं. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
झाडू नेहमी खाली आणि भिंतीला लागून ठेवायला पाहिजे, जेणेकरून तो कोणाच्या पायाखाली येणार नाही. झाडू कधीही उघड्यावर किंवा कोणत्याही उंच ठिकाणी ठेवू नये, कारण यामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते. याव्यतिरिक्त, दिवसा वापरल्यानंतर झाडू एका कोपऱ्यात ठेवून द्यावा, रात्री मुख्य दाराजवळ ठेवणे अशुभ मानले गेले आहे. यामुळे घरात पैशाचे नुकसान आणि मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कोणत्या ठिकाणी झाडू ठेवू नये?
झाडू पूजा घराच्या जवळ ठेवणे टाळावे, कारण तो लक्ष्मीचे प्रतीक मानला गेला आहे आणि तिथे त्याची उपस्थिती अयोग्य मानली जाते.
स्वयंपाकघराच्या जवळ झाडू ठेवल्याने भोजन आणि समृद्धी या दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतो.
झाडू स्नानगृह (बाथरूम) किंवा ड्रेनेज जवळ ठेवणंही वास्तूनुसार चुकीचे मानले जाते, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवल्यानं येणारी शुभ ऊर्जा थांबते, म्हणून तो कधीही प्रवेशद्वाराजवळ ठेवू नका.
जर झाडू बाहेर उघड्यावर पडलेला असेल, तर तो घरात आर्थिक संकट आणि मानसिक अशांतीचे कारण बनू शकतो.
घर खरेदी करताना या वास्तू नियमांना फाटा दिला तर घाट्यात! अडचणी पाठ सोडणार नाहीत
झाडू ठेवण्यासंबंधीचे काही खास नियम
झाडूवर कधीही पाय ठेवू नका, याला अपमान मानला जातो.
तुटलेला किंवा जुना झाडू त्वरित घरातून बाहेर काढावा, कारण तो नकारात्मकता वाढवतो.
रात्रीच्या वेळी झाडू मारू नये, यामुळे घराची समृद्धी कमी होते.
झाडू बदलण्यासाठी शनिवार किंवा अमावस्येचा दिवस सर्वात शुभ मानला गेला आहे.
झाडू नेहमी लपवून ठेवावा, म्हणजे बाहेरील येणाऱ्या लोकांना तो लगेच दिसू नये.
झाडूशी संबंधित शुभ उपाय
रोज सूर्योदयानंतर झाडू मारल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध राहते.
घरात पैशांची कमतरता जाणवत असेल, तर शनिवारी संध्याकाळी नवीन झाडू विकत घेऊन तो घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावा.
नवीन झाडू वापरताना पहिला केर घरातून बाहेरच्या बाजूला काढावा, जेणेकरून वाईट ऊर्जा बाहेर निघून जाईल.
झाडू नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा, कारण ओल्या झाडूमुळे वास्तुदोष वाढू शकतो.
झाडू कधीही दुसऱ्या कोणाला भेट देऊ नका, यामुळे तुमच्या घराच्या समृद्धीवर परिणाम होऊ शकतो.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
