Vastu Tips: घर खरेदी करताना या वास्तू नियमांना फाटा दिला तर घाट्यात! अडचणी पाठ सोडणार नाहीत

Last Updated:

Vastu Tips Marathi: जमीन खरेदी करताना, घर बांधताना आणि गृहप्रवेश करतानासुद्धा वास्तूच्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं मानलं गेलं आहे. योग्य दिशा, स्थान आणि रचना लक्षात घेऊन घर बांधणं केवळ वास्तूनुसार शुभ नसतं, तर...

News18
News18
मुंबई : वास्तुशास्त्राच्या माध्यमातून हे कळतं की घरात कोणत्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवायला पाहिजेत, ज्यामुळे घराचं वातावरण सुखद आणि शांत राहील. याशिवाय, जमीन खरेदी करताना, घर बांधताना आणि गृहप्रवेश करतानासुद्धा वास्तूच्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं मानलं गेलं आहे. योग्य दिशा, स्थान आणि रचना लक्षात घेऊन घर बांधणं केवळ वास्तूनुसार शुभ नसतं, तर यामुळे आयुष्यात शांती, समृद्धी आणि आरोग्यही टिकून राहतं. जर तुम्हीसुद्धा घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करत असाल, तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजेत.
धार्मिक स्थळ - वास्तुशास्त्रानुसार, मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा इतर पूजास्थळांसमोर किंवा त्यांच्या जवळ घर किंवा जमीन खरेदी करणं शुभ मानलं जात नाही. असं केल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे घर आणि कुटुंबाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो.
घाण किंवा कचऱ्याचा ढिग - वास्तुशास्त्रानुसार, घर किंवा जमिनीसमोर कचऱ्याचा ढिग असणं खूप अशुभ मानलं जातं. याचा थेट परिणाम घरात राहणाऱ्या लोकांची ऊर्जा आणि आरोग्यावर होतो. जर घरासमोर किंवा आसपास कचऱ्याचा ढिग जमा होत असेल, तर वास्तुदोषही निर्माण होतो. कचऱ्याचा ढिग घरात दरिद्रता आणि आर्थिक संकट घेऊन येतो, असं मानलं जातं. वास्तुतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, घर किंवा जमिनीसाठी अशी जागा निवडावी, जिथे चोहोबाजूला स्वच्छता आणि व्यवस्थितपणा टिकून राहील.
advertisement
जमिनीच्या बरोबर मध्यभागी खड्डा नसावा - वास्तु शास्त्रानुसार, जमीन निवडताना तिचं स्थान आणि स्थिती खूप महत्त्वाची असते. जमिनीच्या बरोबर मध्यभागी कोणताही खड्डा, विहीर किंवा कोणतीही मोकळी खोल जागा असेल, तर त्या ठिकाणी घर बांधणं किंवा जमीन खरेदी करणं अशुभ मानलं जातं. अशी जागा केवळ वास्तुदोषच निर्माण करत नाही, तर याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. अशा प्रकारच्या जमिनीवर घर बांधल्यास कुटुंबाला आर्थिक नुकसान आणि पैशाच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तसेच, कुटुंबात अस्थिरता आणि अडचणी वाढू शकतात. वास्तु शास्त्रानुसार, हा दोष विशेषतः संपत्ती, धन आणि समृद्धीवर वाईट परिणाम करतो.
advertisement
उंचीचं लक्ष ठेवावं
वास्तु शास्त्रानुसार, जर तुमच्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला डोंगर, उंच टेकडी किंवा कोणतंही मोठं उंच ठिकाण असेल, तर ते शुभ मानलं जात नाही. यामुळे तुमच्या विकासात आणि प्रगतीमध्ये अडथळे येतात, असं मानलं जातं. पूर्व आणि उत्तर दिशांना वास्तूत विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिशा सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येतात. जर या दिशांना कोणतीही उंची किंवा डोंगर असेल, तर ते सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणू शकतं आणि घरात आर्थिक किंवा सामाजिक समस्या निर्माण करू शकतं. मात्र, दक्षिण आणि पश्चिम दिशेला उंच ठिकाण असणं शुभ मानलं जातं. या दिशेतील उंची घराची सुरक्षा, स्थिरता आणि कुटुंबाचा मान-सन्मान वाढवते.
advertisement
वास्तुशास्त्रामध्ये पूर्व आणि उत्तर दिशा खूप शुभ मानल्या गेल्या आहेत. जर तुमच्या घराच्या जवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला कोणताही जलाशय, तलाव किंवा पाण्याचा स्रोत असेल, तर ते अत्यंत फायदेशीर मानलं जातं. यामुळे घरात धनाची वाढ होते आणि कुटुंबाच्या वंशातही वाढ होते, असं मानलं जातं.
घराचा मुख्य दरवाजाही वास्तूनुसार खूप महत्त्वाचा असतो. घराचा मुख्य दरवाजा जर पूर्व दिशेकडे असेल, तर तो अत्यंत शुभ मानला जातो. पूर्व दिशेकडे तोंड असलेला दरवाजा कुटुंबात समृद्धी, आरोग्य आणि सुख-शांती आणायला मदत करतो, असं मानलं गेलं आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घर खरेदी करताना या वास्तू नियमांना फाटा दिला तर घाट्यात! अडचणी पाठ सोडणार नाहीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement