महिला डॉक्टर प्रकरणात आरोप झाल्याने रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर, फडणवीसांच्या सभेत रडले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
RanjeetSingh Nimbalkar Cry: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात होत असलेले सगळे आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खोडून काढले.
फलटण, सातारा : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आरोप होत आहेत. महिला डॉक्टरने एका पत्रात खासदाराच्या पीएने तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी आपल्यावर अनेकवेळा दबाव टाकल्याचा आरोप केला. हाच धागा पकडून विरोधी पक्षाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी केली. याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेत बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अश्रू अनावर झाले.
फलटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आज फलटणमध्ये आले होते. या कार्यक्रमाला मंचावर मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, फलटणचे आमदार सचिन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, प्रशासकीय आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
advertisement
मलाही दोन मुली, असे आरोप होतात त्यावेळी मन विषण्ण होते, निंबाळकरांना अश्रू अनावर
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात होत असलेले सगळे आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खोडून काढले. मलाही दोन मुली आहेत. असे आरोप ज्यावेळी होतात त्यावेळी मन विषण्ण होते, असे सांगत असताना निंबाळकरांच्या डोळ्यात अश्रू होते. परंतु जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही असे सांगत ज्यांची लंगोटी फिटली आहे असे लोक नाहक माझ्यावर आरोप करीत आहेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले.
advertisement
शायराना अंदाजात रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधकांना उत्तर
कुछ लोग समुंदर खंगालने में लगे है, हमारी कमियाँ ढुँढने में लगे हैं, उनकी खुद की लंगोटी फटी हैं और हमारें उपर किचड़ उचालने में लगे है, अशा शायराना अंदाजात त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत या प्रकरणात आपला काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रणजितसिंह निंबाळकर यांची पाठपाखण
आमच्या धाकट्या भगिनीने आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपी अटक झाले आहेत. जे जे दोषी असतील त्यापैकी कुणालाही सोडणार नाही परंतु पण राजकारणात सध्या वाईट प्रयोग सुरू आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे असा निंदनीय प्रयत्न होतायेत. या प्रकरणात कसलाही संबंध नसताना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटील यांची नावे घुसविण्याचा प्रयत्न झाला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांना थेटपणे क्लिनचिट देऊन टाकली. तसेच रणजितसिंह निंबाळकर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा असल्याची ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली.
view commentsLocation :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
October 26, 2025 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिला डॉक्टर प्रकरणात आरोप झाल्याने रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर, फडणवीसांच्या सभेत रडले


