जिन्याची योग्य दिशा आणि स्थान -
नैर्ऋत्य कोन (दक्षिण-पश्चिम): जिन्यासाठी ही दिशा खूप शुभ मानली जाते. वास्तूमध्ये नैर्ऋत्य कोपरा उंच आणि जड ठेवणं शुभ मानलं गेलं आहे, आणि इथे जिन्याचं बांधकाम केल्याने ही गरज पूर्ण होते.
वायव्य कोन (उत्तर-पश्चिम): ही दिशा जिन्याच्या बांधकामासाठी एक चांगला पर्याय आहे.
टाळण्याची दिशा (ईशान्य कोन): चुकूनही जिना ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) बांधायचा नाही. हे स्थान हलकं आणि मोकळं असावं लागतं, पण जिना या क्षेत्राला जड बनवतो, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.
advertisement
जिन्याची रचना आणि महत्त्वाचे नियम -
भिंतीचा स्पर्श: जिन्याने शक्यतोवर घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीला थेट स्पर्श करायचा नाही.
पायऱ्यांची संख्या: जिन्याच्या पायऱ्यांची संख्या नेहमी विषम (Odd) असायला पाहिजे, जसे की ५, ७, ९, ११, १५, १७, २१ इत्यादी. सम संख्या (Even Number) असलेल्या पायऱ्या शुभ मानल्या जात नाहीत.
वळण: चढताना जिन्याचं वळण उजवीकडे (Clockwise) असणं शुभ मानलं जातं.
गोलाकार जिना: इमारतीला वेढणाऱ्या गोलाकार (Circular) जिन्याचे बांधकाम करणं टाळावं, त्याला वास्तूमध्ये अशुभ मानलं गेलं आहे.
प्रवेशद्वार: जिन्याच्या सुरूवातीला आणि शेवटी मजबूत दरवाजे (Gates) असायला पाहिजेत. खालचा दरवाजा वरच्या दरवाजाच्या बरोबर किंवा त्यापेक्षा मोठा असायला पाहिजे.
त्रिकोणाचा निषेध: जिन्याची सुरुवात त्रिकोणी आकाराच्या पायरीने करायची नाही.
जिन्याखालील जागेचा उपयोग -
जिना घरात प्रवेश करताच समोरच्या बाजूला दिसायला नको आणि घराच्या अगदी मध्यभागी (ब्रह्म स्थान) नसायला पाहिजे. असा जिना घरात प्रवेश करताच तणाव वाढवू शकतो. अशी परिस्थिती असेल, तर त्याच्या दोन्ही बाजूला फुलांची कुंडं (गमले) ठेवणं शुभ असतं. जिन्याखाली बेडरूम, बैठकीची खोली (ड्रॉईंग रूम), पूजा घर किंवा शौचालय अजिबात बांधायचं नाही. जिन्याखालील मोकळ्या जागेचा वापर भांडारगृह किंवा गोदाम (Storage) म्हणून केला जाऊ शकतो.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
