TRENDING:

Vinayaka Chaturthi: वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी! पूजेचा हा अभिजित मुहूर्त चुकवू नका; भद्रकाळ अन् पंचक

Last Updated:

December Vinayaka Chaturthi 2025 Date: विनायकी दिवशी व्रत आणि पूजन केल्यानं सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि अडचणींपासून मुक्ती मिळते. विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा दुपारच्या वेळी केली जाते. यावेळी पूजेसाठी तुम्हाला 1 तास 52 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे. पौष विनायक चतुर्थी कधी आहे आणि पूजेचा मुहूर्त वैगेर जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : या वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आहे. या दिवशी भद्रकाळ लागत असून तिचा निवास पाताळ लोकात आहे. सोबतच पंचक सुद्धा असेल. या विनायक चतुर्थीला काही ठिकाणी विघ्नेश्वर चतुर्थी असंही म्हणतात. या दिवशी व्रत आणि पूजन केल्यानं सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि अडचणींपासून मुक्ती मिळते. विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा दुपारच्या वेळी केली जाते. यावेळी पूजेसाठी तुम्हाला 1 तास 52 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे. पौष विनायक चतुर्थी कधी आहे आणि पूजेचा मुहूर्त वैगेर जाणून घेऊ.
News18
News18
advertisement

डिसेंबरची विनायक चतुर्थी -

पंचांगानुसार, या वर्षातील शेवटच्या विनायक चतुर्थीसाठी पौष शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात 23 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी होईल. या तिथीची समाप्ती 24 डिसेंबरला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार, डिसेंबरमधील विनायक चतुर्थीचं व्रत 24 डिसेंबर, बुधवार रोजी आहे.

बुधवार आणि विनायक चतुर्थीचा संयोग -

advertisement

यावेळच्या विनायक चतुर्थीला बुधवारचा शुभ संयोग जुळून आला आहे. विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते आणि बुधवार हा दिवस सुद्धा गणपतीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी खास मानला जातो. या विनायक चतुर्थीच्या व्रताचं दुप्पट फळ भाविकांना मिळणार आहे. विनायक चतुर्थीला हर्षण योग पहाटेपासून ते संध्याकाळी 04:02 पी एम पर्यंत आहे, त्यानंतर वज्र योग असेल. तसेच धनिष्ठा नक्षत्र पहाटेपासून ते पूर्ण रात्रीपर्यंत असेल.

advertisement

विनायक चतुर्थी मुहूर्त -

विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दिवसा 11 वाजून 19 मिनिटांनी सुरू होऊन दुपारी 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत आहे. या दरम्यान शुभ-उत्तम मुहूर्त 11:03 ए एम पासून दुपारी 12:21 पी एम पर्यंत राहील. त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त 05:22 ए एम ते 06:16 ए एम पर्यंत आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त नाही.

advertisement

पंचक आणि भद्रकाळात विनायक चतुर्थी -

वर्षाच्या शेवटच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रा आणि पंचक दोन्ही आहेत. भद्रा सकाळी 07:11 ए एम ला सुरू होईल आणि दुपारी 01:11 पी एम पर्यंत असेल. विनायक चतुर्थीच्या दिवशी राहूकाळ दुपारी 12:21 पी एम ते 01:38 पी एम पर्यंत असेल. तसेच पंचक संध्याकाळी 07:46 पी एम पासून सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबरला सकाळी 07:12 ए एम पर्यंत असेल. बुधवारी सुरू होणाऱ्या पंचकाला राज पंचक म्हणतात आणि ते अशुभ मानलं जात नाही.

advertisement

विनायक चतुर्थीचं महत्त्व -

विनायक चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेश पूजन केल्यानं आयुष्यात शुभता वाढते. गणपतीच्या कृपेने सर्व कामं यशस्वी होतात आणि संकटं दूर होतात. या दिवशी पूजेच्या वेळी गणपतीला दुर्वा नक्की अर्पण कराव्यात. मात्र, या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं निषिद्ध मानलं जातं, हे लक्षात ठेवावं.

पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vinayaka Chaturthi: वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी! पूजेचा हा अभिजित मुहूर्त चुकवू नका; भद्रकाळ अन् पंचक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल