TRENDING:

Diwali Puja 2025: घरातील मुलांचे आयुष्य वाढतं..! गोवत्स द्वादशी-वसुबारस सणाचे धार्मिक महत्त्व काय?

Last Updated:

Diwali Puja 2025: गोवत्स द्वादशीचे व्रत ठेवल्याने घरातील मुलांचे आयुष्य वाढते आणि कुटुंबात समृद्धी येते. या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि गाय व वासरू यांची पूजा कोणत्या पद्धतीने केली जाते, याविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गायीच्या पूजनासाठी दरवर्षी गोवत्स द्वादशी व्रताचा संकल्प केला जातो. या सणावर गाय आणि वासरू यांची विधीनुसार पूजा केली जाते आणि काही नियमांचे पालन केलं जातं. गोवत्स द्वादशी व्रताला वसुबारस आणि वाघ बारस या नावांनी देखील ओळखलं जातं. याला बछ बारस, नंदिनी व्रत असंही म्हणतात. गोवत्स द्वादशीचे व्रत ठेवल्याने घरातील मुलांचे आयुष्य वाढते आणि कुटुंबात समृद्धी येते. या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि गाय व वासरू यांची पूजा कोणत्या पद्धतीने केली जाते, याविषयी जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

गोवत्स द्वादशी कधी?

दरवर्षी आश्विन कृष्ण द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशीचे व्रत केलं जातं. पंचांगानुसार आश्विन कृष्ण द्वादशी तिथी १७ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल आणि तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी १८ ऑक्टोबर २०२५, शनिवार रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी होईल. गोवत्स द्वादशीला प्रदोष काळ महत्त्वाचा मानला जात असल्यानं १७ ऑक्टोबर रोजी व्रत केलं जाईल.

advertisement

गोवत्स द्वादशी व्रताचे नियम -

गोवत्स द्वादशीच्या दिवशी काही पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. गहू, तांदूळ आणि गाईच्या दुधापासून बनवलेल्या वस्तू खाऊ नका. म्हशीचे दूध, फळांचे सेवन करू नये. चाकू किंवा कोणत्याही धारदार वस्तूचा वापर करणे वर्जित आहे. तामसिक पदार्थांचे सेवन करू नका.

गोवत्स द्वादशी पूजा मुहूर्त - गोवत्स द्वादशीला प्रदोषकाळात पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी द्वादशी तिथी लागल्यानंतर प्रदोषकाळात पूजेचा मुहूर्त सायंकाळी ०५ वाजून ४९ मिनिटांपासून रात्री ०८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. याच शुभ मुहूर्तावर गोवत्स द्वादशीची पूजा करावी.

advertisement

जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अ‌ॅटिट्यूड दाखवतात

गोवत्स द्वादशी पूजा विधी -

गोवत्स द्वादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

गौमाता आणि वासरू यांची पूजा करावी.

पूजेपूर्वी गौमाता आणि तिच्या वासराला स्नान घालावे.

शिंगे सजवावी आणि त्यांना हारही घालावा.

advertisement

गौमाता आणि तिच्या वासराला रोळी आणि चंदन अर्पण करावे.

गौमाता आणि तिच्या वासराला दिवा दाखवावा आणि श्रद्धापूर्ण मनाने पूजा करावी.

पिठाच्या (आट्याच्या) गोळ्यात गूळ घालून गाईला नैवेद्य अर्पण करावा.

दिवा लावून गौमाता आणि वासराची आरती करावी.

गोवत्स द्वादशीची कथा ऐकावी आणि इतरांना सांगावी.

दिवसभर व्रत करावे आणि दुसऱ्या दिवशी पारण (व्रत सोडणे) करावे.

advertisement

यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Diwali Puja 2025: घरातील मुलांचे आयुष्य वाढतं..! गोवत्स द्वादशी-वसुबारस सणाचे धार्मिक महत्त्व काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल