TRENDING:

Skoda Kushaq Facelift येतेय नव्या अवतारात! फीचर्स जबरदस्त, Seltos-Sierraला थेट टक्कर

Last Updated:

Skoda ने 2026 Kushaq Facelift चा पहिलाय टीझर जारी केला आहे. यासोबतच मिड-साइंट एसयूव्ही सेगमेंटमध्ये हालचाली वाढल्या आहेत. पॅनोरमिक सनरुफ, ADAS, नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि जास्त प्रीमियम फीचर्ससह नवीन Kushaq आपल्या सध्याच्या आवतारापेक्षा खुप जास्त दमदार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Skoda Kushaq Facelift: Skoda Auto India ने आपली प्रसिद्ध SUV Kushaq च्या 2026 फेसलिफ्ट मॉडलचा पहिला टीझर जारी केला आहे. या डीझरसह स्पष्ट झालंय की, कंपनी Kushaq फक्त कॉस्मेटिक अपडेट नाही, तर फीचर्स आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही पहिल्यापेक्षा खुप जास्त मजबूत बनवत आहे. Tata Sierra आणि नवीन Kia Seltos सारख्या SUVs आल्याने मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये पहिलेच खुप तापला आहे, अशावेळी  Skoda लाही कठोर टक्करसाठी पूर्ण तयारी करावी लागेल.
स्कोडा कुशाक फेसलिफ्ट
स्कोडा कुशाक फेसलिफ्ट
advertisement

या महिन्यात लॉन्च होणार Kushaq Facelift

Skoda Kushaq फेसलिफ्ट जानेवारी 2026 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, याची संभाव्य लॉन्च टेड 19 किंवा 20 जानेवारी 2026 मानली जात आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने याचा टीझर दाखवून उत्सुकता वाढवली आहे. Skoda Kushaq पहिलेच भारतातील सर्वात सुरक्षित 4.2 ते 4.4 मीटर लंबी SUVs मध्ये गणली जाते आणि फेसलिफ्टसह याची पोझिशन आणखी मजबूत होणार आहे.

advertisement

टीझरमध्ये काय खास आहे?

टीझरमध्ये हिरव्या कव्हरमध्ये झाकलेली एक एसयूव्ही एका मोकळ्या मैदानात उभी केलेली दाखवण्यात आली आहे. वाऱ्याच्या एका झुळूकामुळे कव्हर थोडेसे वर येते, परंतु संपूर्ण कार स्पष्टपणे दिसत नाही. यावरून स्पष्ट होते की स्कोडा सध्या डिझाइनबद्दल जास्त काही सांगण्यास तयार नाही, तर सस्पेन्स कायम ठेवू इच्छित आहे.

भारतात Tesla Cars वर मिळतंय मोठं डिस्काउंट! पाहा कोणते मॉडल झाले स्वस्त

advertisement

डिझाइनमध्ये किरकोळ बदल

कुशाक फेसलिफ्टमध्ये लक्षणीय डिझाइन बदल अपेक्षित नाहीत. कारची साइड प्रोफाइल आणि बेसिक सिल्हूट सध्याच्या मॉडेलसारखेच राहण्याची अपेक्षा आहे. तसंच, पुढील आणि मागील बाजूस बदल दिसून येण्याची अपेक्षा आहे. नवीन ग्रिल, सुधारित बंपर आणि नवीन लाइटिंग एलिमेंट्स या फेसलिफ्टचा भाग असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे एसयूव्हीला थोडासा फ्रेश लूक मिळेल.

advertisement

फीचर्समध्ये होईल मोठं अपग्रेड 

2026 Skoda Kushaq फेसलिफ्टचा सर्वात मोठा फोकस फीचर्सवर राहणार आहे. स्पाय शॉर्टमुळे हे कंफर्म झालंय की, यामध्ये पॅनोरमिक सनरुफ दिला जाईल. ज्याची भारतीय बाजारात खुप डिमांड आहे. या व्यतिरिक्त रियर डिस्क ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, जास्त पॉवरफूल AC आणि इंफोटेनमेंट व इंस्ट्रूमेंट क्लस्टरसाठी नवीन ग्राफिक्स मिळण्याची अपेक्षा आहे.

advertisement

पाइपलाइनमध्ये ADAS आणि लक्झरी टच

स्कोडा कुशाक फेसलिफ्टमध्ये लेव्हल-2 ADAS सेफ्टी फीचर्स असू शकतात. कारण या सेगमेंटमधील अनेक प्रतिस्पर्धी SUV आता ही टेक्नोलॉजी देतात. अशीही चर्चा आहे की स्कोडा मागील सीटसाठी मसाज फंक्शन देखील देऊ शकते, जे या सेगमेंटमध्ये पूर्णपणे नवीन आणि यूनिक फीचर असेल.

Hero Splendor कमी कमी किती डाउनपेमेंटवर मिळेल? जाणून EMI चा पूर्ण हिशोब

इंजिन आणि गियरबॉक्समध्ये काय नवीन असेल 

पॉवरट्रेनविषयी बोलायचं झाल्यास 2026 Kushaq फेसलिफ्टमध्ये उपलब्ध टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 1.0 लीटर TSI तीन-सिलेंडर इंजिन आणि 1.5 लीटर TSI चार-सिलेंडर इंजनचा समावेश असेल. 1.5 लीटरइंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड DCT गिअरबॉक्स मिळू शकतात. तर 1.0 लीटर इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअलसह नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.

Skoda Kushaq कठोर टक्करसाठी तयार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पायाच्या अंगठ्यामध्ये तीव्र वेदना? दुर्लक्ष करू नका; असू शकतं गंभीर कारण, Video
सर्व पहा

Tata Sierra ची एंट्री आणि येणाऱ्या नवीन मॉडल्सनंतर या सेगमेंटमध्ये एकूण 15 SUVs होतील. अशावेळी Skoda Kushaq फेसलिफ्ट चा हा अपडेट कंपनीसाठी खुप महत्त्वाचा ठरु शकतो. भारी फीचर्स, मजबूत सेफ्टी आणि विश्वासार्ह इंजिनसह Skoda Kushaq 2026 मध्ये ग्राहकांचं लक्ष वेधण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/ऑटो/
Skoda Kushaq Facelift येतेय नव्या अवतारात! फीचर्स जबरदस्त, Seltos-Sierraला थेट टक्कर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल