Hero Splendor कमी कमी किती डाउनपेमेंटवर मिळेल? जाणून EMI चा पूर्ण हिशोब
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Hero Splendor on EMI: तुम्हालाही हिरो स्प्लेंडर खरेदीची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी ईएमआयचा हिशोब जाणून घेणे खुप गरजेचे आहे. चला जाणून घेऊया डिटेल्स...
भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकलमध्ये हिरो स्प्लेंडर प्लसचं नावही आहे. मार्केटमध्ये या बाईकची मागणी अनेक वर्षांपासून आहे. जीएसटी कपातीनंतर या बाईकच्या किंमतीत कपात झाली आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स-शोरुम किंमत 73,902 रुपयांपासून सुरु होऊन 76,437 रुपयांपर्यंत जाते. स्प्लेंडर प्लसच्या चार व्हेरिएंट भारतीय बाजारात समाविष्ट आहेत.
advertisement
तुम्ही हिरो स्प्लेंडर EMI वर कसा खरेदी करू शकता? : हिरो स्प्लेंडर प्लस खरेदी करण्यासाठी पूर्ण पैसे भरावे लागत नाहीत. तुम्ही ही बाईक निश्चित मासिक EMI देऊन कर्जावर देखील खरेदी करू शकता. ही बाईक खरेदी करण्यासाठी, तुम्हाला ₹9,000 चे डाउन पेमेंट आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही 4 किंवा 5 वर्षांसाठी EMI ची व्यवस्था देखील करू शकता.
advertisement
advertisement
दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? : हिरो स्प्लेंडर प्लसच्या स्टँडर्ड मॉडलला खरेदी करण्यासाठी तुम्हाला 79,057 रुपयांचं लोन घ्यावं लागेल. तुम्ही 9 टक्केच्या वाजावर तीन वर्षांसाठी लोन घेतले. तर तुम्हाला 36 महिन्यापर्यंत दरमहा 2,514 रुपये बँकेत जमा करावे लागतील. यामध्ये तुम्हाला पुढील तीन वर्षात 90,504 रुपये बँकेत जमा कराल, ज्यामध्ये 11,447 रुपये इंटरेस्टचे जातील.
advertisement









