PMC Election Result : विकासाचा 'डिजिटल' पॅटर्न! पुणे महापालिकेत 'Gen Z' चा डंका; 22 वर्षीय सई थोपटेसह या तरुण शिलेदारांची एन्ट्री
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनरेशन झेडमधील तरुण उमेदवारांनी या निवडणुकीत ठसा उमटवत थेट नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
advertisement
नागरी समस्या सोडवण्यासाठी आधुनिक उपाययोजना, प्रशासनात पारदर्शकता आणि डिजिटल माध्यमांचा वापर या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे. पुण्यातील सहकारनगर–पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून विजयी झालेल्या सई थोपटे यांनी भ्रष्टाचारमुक्त आणि खुले प्रशासन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक हॉल आणि भरती केंद्र, प्रभागनिहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प, अखंड पाणीपुरवठा, पाईपद्वारे गॅस कनेक्शन, संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे, सरकारी इमारतींमध्ये सौर ऊर्जेचा वापर आणि नागरिकांशी नियमित संवाद अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
advertisement
advertisement
पिंपरी-चिंचवडमधील वॉर्ड क्रमांक 1 मधून विजयी झालेल्या यश साने यांच्यासाठी ही निवडणूक वैयक्तिक संघर्षातून उभारी घेण्याची कहाणी आहे. माझे वडील नगरसेवक होते, पण कोविड काळात त्यांचे निधन झाले. बारावीनंतर मला शिक्षण थांबवावे लागले. त्यांच्या सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करतोय, असे साने सांगतात.
advertisement
आकुर्डी–चिखली रस्त्यावरील वाहतूक व पार्किंग समस्या, स्वच्छता, सुसज्ज भाजीपाला बाजार, सीसीटीव्ही देखरेख, महिला पोलिस ठाणे आणि सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या प्राधान्यक्रमात आहे. उत्पादन डिझाइनमध्ये पदवीधर असलेल्या सिद्धी शिळीमकर यांनी निर्णयप्रक्रिया आणि खर्चाची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देत पूर्ण पारदर्शकतेचे आश्वासन दिले आहे. (फोटो- अंजली)
advertisement
नियमित नागरिक बैठका, 24 तास स्वच्छ पाणीपुरवठा, कार्यक्षम कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा, पर्यावरण जागरूकता आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांच्या अजेंड्यातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकूणच, जनरेशन झेडच्या या तरुण नगरसेवकांकडून अपेक्षा मोठ्या आहेत. अनुभव कमी असला तरी ऊर्जा, कल्पकता आणि आधुनिक दृष्टिकोनाच्या जोरावर हे नवे नेतृत्व शहरांच्या कारभारात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.









