राज्यात एमआयएमची पंतग उडाली...फक्त नगरसेवकच नाही तर 4 महापालिकांमध्ये असणार विरोधी पक्षनेता
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्यात अनेक ठिकाणी मुस्लीमबुल भागांमध्ये एमआयएमच्या पक्षाने भरारी घेतली आहे. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमांचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झाले आहे.
मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून येत असताना एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. जेथे एमआयएचे नगरसेवक नव्हते तेथे देखील त्यांनी खाते उघडले आहे. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमांचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झाले आहे.राज्यात अनेक ठिकाणी मुस्लीमबुल भागांमध्ये एमआयएमच्या पक्षाने भरारी घेतली आहे. पक्षाचा प्रभाव केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यातील तब्बल चार महानगरपालिकांमध्ये एमआयएमचा विरोधी पक्ष नेता असणार आहे.
मालेगाव, धुळे, संभाजीनगर आणि नांदेड-वाघाळा या चार महापालिकांमध्ये एमआयएम पक्षाने मोठ्या विरोधी पक्षाची भूमिका मिळवत दमदार उपस्थिती नोंदवली आहे. विशेषतः मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमच्या कामगिरीने सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष वेधले आहे.
मालेगावात गणित काय आहे?
मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागांपैकी इस्लाम पक्षाने 35 तर एमआयएमने 26 जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ 2 , काँग्रेसला 3 तर शिवसेना शिंदे गटाला 18 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालात एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत मजबूत विरोधी पक्षाची भूमिका मिळवली आहे.
advertisement
धुळ्यात काय गणित आहे?
धुळे महापालिकेत भाजपने 50 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली असली, तरी एमआयएमने 10 जागा जिंकत महत्त्वपूर्ण उपस्थिती दाखवली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8, शिवसेना शिंदे गटाला ५ तर इतरांना 1 जागा मिळाली. येथेही एमआयएम विरोधी राजकारणात निर्णायक ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगमध्ये काय गणित आहे?
advertisement
संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 जागांपैकी भाजप 57 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र एमआयएमने तब्बल 33 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्षाचा मान मिळवला आहे. शिवसेना शिंदे गटाला 13, शिवसेना ठाकरे गटाला 6, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 तर इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत.
नांदेडमध्ये काय गणित आहे?
advertisement
नांदेड-वाघाळा महापालिकेत भाजपने 45 जागांसह वर्चस्व राखले आहे. काँग्रेसला 10, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या असताना एमआयएमने 14 जागा जिंकून प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे.
मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमची मजबूत पकड
या चारही महापालिकांच्या निकालांवरून राज्यातील अनेक मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात एमआयएमची पंतग उडाली...फक्त नगरसेवकच नाही तर 4 महापालिकांमध्ये असणार विरोधी पक्षनेता








