'जिंदगी बीत गई लेकिन…', वयाच्या 83 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली खंत, होतोय या गोष्टींचा पश्चाताप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी एक खंत व्यक्त केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बिग बी लिहितात,“दररोज काही ना काही नवीन शिकायला मिळते, पण दुर्दैव हे आहे की ज्या गोष्टी शिकायला हव्या होत्या, त्या अनेक वर्षांपूर्वीच शिकायला हव्या होत्या.” आपल्या पोस्टमध्ये पुढे ते लिहितात, “पश्चात्ताप जास्त यासाठी वाटतो की जे काही आज शिकले जात आहे, ते त्या काळात अस्तित्वातच नव्हते… आणि आता शिकण्याची इच्छा, प्रयत्न आणि ऊर्जा वय आणि वेळेसोबत कमी होत चालली आहे.
advertisement
नवीन शोध आणि तंत्रज्ञानाचा वेग इतका प्रचंड आहे की तुम्ही ते शिकायला सुरुवात करता, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आज अनेक मीटिंग्समधून हाच निष्कर्ष निघतो की आधी मूलभूत गोष्टी नीट समजून घ्याव्यात आणि नंतर काम पूर्ण करण्यासाठी आजच्या काळातील सर्वोत्तम टॅलेंट आणि तज्ज्ञांना नेमावे, म्हणजे काम पूर्ण होईल, असं अमिताभ बच्चन म्हणतात.
advertisement
बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये हेही सांगितले की एखादे काम स्वतःला जमत नसेल तर ते कसे करून घ्यावे. बिग बी लिहितात,“जर तुम्हाला एखादे काम माहित नसेल किंवा ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पात्र नसाल, तर काही हरकत नाही. ते स्वीकारा, मग तुमच्या पसंतीच्या तज्ज्ञांना ते सोपवा आणि काम पूर्ण करून घ्या. काम स्वीकारले… तज्ज्ञ नेमले… आणि काम झाले… माझ्या काळात, जर तुम्हाला एखाद्या कामाची माहिती नसेल तर तुम्हाला पश्चात्ताप व्हायचा आणि तुम्ही ते काम करू शकत नव्हतात… पण आता तसे नाही. तुम्ही काम हातात घेता आणि आउटसोर्सिंगद्वारे ते पूर्ण करून घेता. वा! योग्य शब्द वापरल्याने किती हलके वाटले!”










