Death Sign: मृत्यू जवळ आल्याची कुणकुण! 7 दिवस आधीच अशा गोष्टी जाणवतात, खाणं-पिणं आपोआप कमी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Animals know before death : मृत्यूवर विजय मिळवणं आत्तापर्यंत तरी कोणाला जमलेलं नाही. जन्म झालेल्या प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे. जीवनाचा शेवटचा क्षण केव्हा येईल हे सांगता येत नाही. मात्र, गरुड पुराणानुसार मृत्यू जवळ आल्यावर मानवी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात, जसे की दृष्टी कमी होणे, स्वतःची सावली न दिसणे किंवा ऐकण्या-बोलण्याची शक्ती क्षीण होणे. याचप्रमाणे प्राण्यांनाही त्यांच्या मृत्यूची चाहूल आधीच लागते, अशी मान्यता आहे.
काही प्राणी असे आहेत ज्यांना मृत्यूच्या साधारण 7 दिवस आधीच आपली वेळ जवळ आल्याचे समजते. मृत्यूची चाहूल लागल्यावर प्राण्यांमध्ये दिसणारे बदल खालीलप्रमाणे आहेत. असे मानले जाते की विंचवाला त्याच्या मृत्यूचा अंदाज आधीच येतो. मृत्यूच्या साधारण 7 दिवस आधीपासून विंचू अन्न-पाणी सोडतो. त्याच सोबत इतर प्राण्यांविषयी आपण जाणून घेऊया.
advertisement
advertisement
कुत्रा - कुत्र्यांना केवळ स्वतःच्याच नाही, तर त्यांच्या मालकाच्या मृत्यूचीही चाहूल लागते, असे म्हटले जाते. जेव्हा कुत्र्याला स्वतःचा मृत्यू जवळ आल्याचे समजते, तेव्हा तो खाणे-पिणे सोडतो. मालकाच्या मृत्यूची चाहूल लागल्यास कुत्रा अधिक व्याकुळ होतो आणि जास्तीत जास्त वेळ मालकासोबत राहण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
advertisement
वैज्ञानिक कारण काय? - वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्राण्यांमध्ये गंध ओळखण्याची आणि वातावरणातील बदल टिपण्याची क्षमता मानवापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. मृत्यू जवळ आल्यावर शरीरात जे सूक्ष्म रासायनिक बदल होतात, ते प्राणी सहज ओळखू शकतात. या व्यतिरिक्त भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींची चाहूलही प्राण्यांना आधीच लागते, त्यामुळेच ते मृत्यूचे संकेतही ओळखू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









