सध्या बाजारात अॅडव्हेंचर बाइक्सची काही बजेट मॉडेल्स उपलब्ध आहेत. या मॉडेल्सबाबत सविस्तर जाणून घेऊया. अॅडव्हेंचर बाइकच्या सेगमेंटमध्ये
सुझुकीची व्ही-स्ट्रॉम एसएक्स एक किफायतशीर पर्याय ठरू शकते. या बाइकची एक्स शोरूम किंमत 2.13 लाख रुपये आहे. फीचर्सचा विचार करता या बाइकमध्ये एक एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सह डिजिटल कन्सोल, एक यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि ड्युएल चॅनेल एबीएस देण्यात आलं आहे. या बाइकमध्ये 249CC, सिंगल सिलिंडर एअर/ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 26.5PS ची पॉवर आणि 22.2Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.
advertisement
नवीन हिमालयन 450 या बाइकला नुकताच इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार मिळाला आहे. या बाइकमध्ये 451cc, सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे. बाइकला 6 स्पीड गिअरबॉक्स आहेत. ही बाइक 8000rpm वर 40.02PS आणि 5500rmp वर 40Nm टॉर्क जनरेट करू शकते. मोटरसायकलमध्ये ऑल एलईडी लायटिंग, राइड बाय वायर, यूएसडी फ्रंट फोर्क्स, एक रिअर मोनोशॉक, एक 320 मिमी सिंगल फ्रंट डिस्क, एक 270 मिमी रिअर सिंगल डिस्क, गुगल मॅप्स सपोर्टसह ऑल डिजिटल कलर टीएफटी डिस्प्ले, ड्युएल चॅनेल आणि स्विचेबल एबीएस, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, तीन राइड मोड आणि स्लिप अँड असिस्ट क्लच यांसारखी फीचर्स आहेत. नवीन हिमालयन 450 ची एक्स शोरूम किंमत 2.69 लाखांपासून 2.84 लाख रुपयांदरम्यान आहे.
bikes : मजबूत मायलेज असूनही भारतातल्या लोकांनी नाकारलं, तीच बाईक परदेशात ठरली नंबर वन!
ट्रायम्फची नवीन स्क्रॅम्बलर 400 X एडीव्ही अॅडव्हेंचर सेंगमेंटमधली खास बाइक आहे. तिची एक्स शोरूम किंमत 2.63 लाख रुपये आहे. या बाइकमध्ये 398.15cc, सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8000 rpm वर 40ps पॉवर तर 6500rpm वर 37.5Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. यात ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युएल चॅनेल एबीएस, एलईडी लाइटिंग, राइड-बाय वायर, एक स्लिप आणि असिस्ट क्लच, एक सेमी अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स आहेत.
येजदी अॅडव्हेंचर मॅट आणि ग्लॉसी कलरमध्ये उपलब्ध आहे. शेड्सच्या पर्यायानुसार तिची एक्स शोरूम किंमत 2.16 लाख ते 2.20 लाख रुपयांदरम्यान आहे. या बाइकमध्ये 334cc, सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन असून, ते 30.30ps पॉवर आणि 29.84Nm टॉर्क जनरेट करतं. या बाइकला 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, एक रिअर मोनोशॉक, ड्युएल चॅनेल एबीएस, एक 320mm फ्रंट डिस्क, एक 220mm रिअर डिस्कस वायर स्पोक व्हील, ब्लूटूथ इनेबल्ड डिजिटल डिस्प्ले, यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि तीन रायडिंग मोड अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
TATA च्या Nexon चं वादळ रोखणार KIA ची SUV; फक्त 5 फिचर्स बदलणार संपूर्ण गणित
केटीएम 250 अॅडव्हेंचर ब्रँड अॅडव्हेचर मोटरसायकल्सच्या लाइनअपमध्ये सर्वांत किफायतशीर आहे. या बाइकमध्ये 248.76cc, सिंगल सिलिंडर लिक्विड-कू्ल्ड इंजिन आहे. इंजिनला 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. हे इंजिन 30PS पॉवर आणि 24Nm टॉर्क जनरेट करतं. यात एलसीडी डिस्प्ले, ऑफ-रोड एबीएस, एक स्लिप अँड असिस्ट क्लच, 170 मिमी सस्पेन्शन ट्रॅव्हलसह फ्रंट यूएसडी फोर्क्स आणि 177 मिमी सस्पेन्शन ट्रॅव्हलसह एक रिअर मोनोशॉक सस्पेन्शन मिळतं. या मोटरसायकलची एक्स शोरूम किंमत 2.47 लाख रुपये आहे.