TATA च्या Nexon चं वादळ रोखणार KIA ची SUV; फक्त 5 फिचर्स बदलणार संपूर्ण गणित
- Published by:Priya Lad
Last Updated:
टाटाच्या नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी किआच्या कारचं नवीन मॉडेल नवीन वर्षात लाँच होणार आहे. फीचर्सच्या बाबतीत ही कार नेक्सॉनपेक्षा खूप पुढे दिसेल.
नवी दिल्ली : मजबुती, उत्कृष्ट फिचर्स, लेटेस्ट टेक्नोलॉजी, सुसज्ज इंजिन आणि मध्यमवर्गींच्या बजेटमध्ये असेल अशी किंमत... टाटाच्या सर्व कारमध्ये, एक अशी कार आहे ज्याला सुरक्षेच्या बाबतीत केवळ 5 स्टार रेटिंगच नाही, तर तिचे फिचर्स, लुक आणि परफॉर्मन्सदेखील असा आहे की लोक तिच्यासाठी वेडे झाले आहेत. ही कार टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत पहिल्या स्थानावर आपले स्थान कायम राखत आहे. पण आता या कारला टक्कर देणार आहे. ती कियाची कार.
टाटाची तुफान विक्री होणारी कार आहे टाटा नेक्सॉन. विशेषत: टाटा नेक्सॉनचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच झाल्यापासून या कारची विक्री कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पण आता कोरियन कंपनी Kia नेक्सॉनला आव्हान देण्याची तयारीत आहे. किया आपली एक SUV फेसलिफ्ट लाँच करणार आहे. त्यात काही फीचर्स असतील जे तुम्हाला नेक्सॉनमध्ये बघायला मिळणार नाहीत. या वैशिष्ट्यांच्या आधारे ही कार नेक्सॉनला टक्कर देणार आहे.
advertisement
Kia लवकरच Sonet Facelift लॉन्च करणार आहे. कंपनीने ते बाजारात प्रदर्शित केली आहे. आज आम्ही तुम्हाला कारच्या अशा 5 फिचर्सबद्दल सांगणार आहोत जे नेक्सॉनमध्ये दिसणार नाहीत आणि याच्या आधारे सोनेट टाटाच्या नेक्सॉनला पराभूत करू शकते. चला जाणून घेऊया काय आहेत ही वैशिष्ट्ये.
advertisement
ADAS सह लाँच होणार
लेव्हल 1 ADAS सह Kia Sonet फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. यासोबतच फ्रंट कोलिजन, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि हाय बीम असिस्ट या फीचर्सचा समावेश आहे. तुम्हाला Nexon मध्ये ADAS वैशिष्ट्यं बघायला मिळणार नाही.
एंबिएंट लायटिंग
सोनेटच्या नवीन मॉडेलमध्ये, तुम्हाला LED साउंड अॅम्बियंट लाइटिंग पाहायला मिळेल. तुमच्या इन्फोटेनमेंटवरील संगीताच्या तालानुसार हे बदलेल. जरी तुम्हाला Nexon मध्ये एंबिएट लाइट्स असले तरी ते म्युझिकसोबत सिंक नाहीत.
advertisement
डिस्क ब्रेक्स
नेक्सॉनमध्ये तुम्हाला फक्त पुढच्या चाकांवर डिस्क ब्रेक्स मिळतात. मागील चाकांमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक्स दिसतील. तर Sonet मध्ये तुम्हाला ऑल व्हील डिस्क ब्रेक्स मिळतील. हे कारचे ब्रेकिंग अधिक चांगले आणि सुरक्षित करतात.
रिमोट कंट्रोल्ड एसी
सोनेटमध्ये इंजिन रिमोटने सुरू करण्याच्या पर्यायासह, तुम्ही तुमच्या कारच्या रिमोटवरून एसी देखील ऑपरेट करू शकाल. यासाठी गाडीच्या आत जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी कारला स्मार्ट की दिली जाईल. तुम्हाला हे वैशिष्ट्य Nexon मध्ये दिसणार नाही.
advertisement
एव्हीएसी कंट्रोल
सोनेटमध्ये, तुम्हाला बटणांसह HVAC कंट्रोल दिसेल. हा टच टाटा नेक्सॉनमधील सर्वोत्तम कंट्रोल पॅनेलमध्ये दिला गेला असला तरी तो निश्चितच प्रीमियम आहे पण त्याचा वापर तितकासा सहज नाही आणि काहीवेळा तो नीट कामही करत नाही.
Location :
Delhi
First Published :
December 30, 2023 7:20 PM IST