चुकूनही ट्रिपलिंग करु नका
तुम्ही मैत्रीमुळे तुमच्या बाईकवर ट्रिपलिंग करत असाल तर त्याचे परिणाम इंजिनला भोगावे लागतात, परिणामी मायलेज कमी होते. हे मायलेज राखण्यासाठी आणि इंजिनच्या समस्या टाळण्यासाठी, नेहमी दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे टाळणे महत्वाचे आहे.
SUV: दिवाळीला कार नाही आता 7 सीटर SUV आणा! 5 अशा फॅमिली एसयूव्ही, मायलेज आणि किंमतीला तोड नाही!
advertisement
नियमित सर्व्हिसिंग
तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग जितकी वेळेवर केली जाईल तितकेच तिचे मायलेज चांगले होईल. सर्व्हिसिंगमुळे बाईकमधील किरकोळ समस्या दूर होतात. या समस्या देखील मायलेज कमी करतात. तुम्हाला तुमच्या बाईकचे मायलेज राखायचे असेल तर नेहमीच वेळेवर सर्व्हिसिंग करा.
गाडी खरेदीची बेस्ट वेळ! फक्त ₹1,999च्या EMIवर घरी आणू शकता मारुतीच्या कार
क्विक गियर शिफ्ट टाळा
गियर्स वेगाने वाढवणे किंवा कमी करणे तुमच्या बाईकच्या इंजिनसाठी धोकादायक आहे. असे केल्याने तुमच्या बाईकचे मायलेज कमी होईल हे निश्चित आहे कारण गीअर्स लवकर बदलल्याने इंजिनवर दबाव येतो, ज्यामुळे मायलेज लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
लोकल इंजिन ऑइल
तुमच्या मोटरसायकलमध्ये लोकल इंजिन ऑइल वापरल्याने इंजिन योग्यरित्या लूब्रिकेट करत नाही. ज्यामुळे इंजिनला जास्त काम करावे लागते, जास्त इंधन लागते आणि आपोआप मायलेज कमी होते. हे टाळण्यासाठी, तुम्ही प्रतिष्ठित उत्पादकाकडून इंजिन ऑइल खरेदी करावे.