TRENDING:

Road Safety Week : कार आणि दुचाकी चालकांना वाहतुकीचे हे नियम माहित असलेच पाहिजे!

Last Updated:

भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूंचा आकडा हा वाढतच चालला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपुर्व तळणीकर, प्रतिनिधी 
या वाहतूक नियमांचे पालन करा, तुम्ही सुरक्षित घरी जाल <br>
या वाहतूक नियमांचे पालन करा, तुम्ही सुरक्षित घरी जाल <br>
advertisement

छञपती संभाजीनगर : भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे.  दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यूंचा आकडा हा वाढतच चालला आहे. वाढत्या रस्ते अपघात प्रकरणामुळे केंद्र सरकारपासून ते सुप्रीम कोर्ट वारंवार चिंता व्यक्त करत असते. तसंच नियमांमध्येही बदल करत असते. पण रस्ते वाहतुकीबद्दल बऱ्याच लोकांना नियम माहिती नसतात. त्यामुळे सगळे नियम आणि कायदे धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे प्रत्येकाला वाहतुकीचे नियम हे माहित असणे गरजेचं आहे.

advertisement

1. सीट बेल्ट वापरा :- कार चालवताना सीट बेल्ट लावणे महत्त्वाचे आहे. अपघात झाल्यास, डोके स्टीयरिंग किंवा डॅश बोर्डला लागू नये. मोटार वाहन कायदा, CMVR 177 MVA च्या कलम 183 (3) अंतर्गत, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. म्हणून, कार चालकांसाठी सीट बेल्ट घालणे हा सर्वात महत्वाचा नियम आहे.

advertisement

2. विचलित होऊ नका :  वाहन चालवताना विचलित होऊ नका. सर्व लक्ष रस्त्यावर ठेवा. विचलित होणे टाळा. थोडी खबरदारी घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

3. ओव्हर स्पीड करू नका :  काही जणांना जोरात वाहनं पळवण्याचा नाद असतो. पण असं कधीच करू नका.  प्रत्येक वाहनाचा वेग ठरलेला असतो. त्यामुळे त्यानुसार वाहन चालवा. भरधाव वेगात गाडी चालवल्याने अपघात होऊ शकतो. त्याचा दंडही ठरलेला आहे.

advertisement

4. कार चांगल्या स्थितीत ठेवा : वाहनाची देखभाल करणे आवश्यक आहे.  ना दुरुस्त वाहनांमुळे अपघात होऊ शकतो.

दुचाकीसाठी रस्ता सुरक्षा नियम

5. चांगल्या कंपनीचे हेल्मेट घाला :  वाहन चालवताना नेहमी ISI प्रमाणित हेल्मेट घाला. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वापरले आणि जर अपघात झाला तर  ते तुटून डोक्याला इजा होऊ शकते.

6. लेनचा नियम पाळा: बाईक नेहमी तुमच्या लेनमध्येच चालवा. जिक जॅक करा. त्यामुळे वाहने एकमेकांवर आदळू शकतात. लेन शिस्तीचे पालन करा आणि अरुंद ठिकाणी स्टंट करू नका.

advertisement

#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH

#NitinGadkari

मराठी बातम्या/ऑटो/
Road Safety Week : कार आणि दुचाकी चालकांना वाहतुकीचे हे नियम माहित असलेच पाहिजे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल