सोलापूर पासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात अलका दयानंद कांबळे कुटुंब राहत होतं. मुलं लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. अलका यांची आई आशा ही आपली तीन मुलं अनुप आणि अजित मुलगी अलका या तिघांना घेऊन राहत होती परंतु काळाने या कुटुंबावर घाला घातला. दुर्दैवी एका अपघातात अलका यांची आई आशा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तीनही लेकरांवरील आई वडिलांचे छत्र हरपले. जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा ही तीनही लेकरांनी टाहो फोडत 'आई, तू आम्हाला सोडून गेलीस, सरकारी नोकरी मिळवण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करून दाखवीन' असा शब्द त्यावेळी दिला होता.
advertisement
सातवी पास शेतकऱ्याने youtube पाहून केला प्रयोग, काश्मिरचं 'सोनं' शेतात पिकवून दाखवलं, Video
त्यानंतर हे तीनही भावंडे सोलापूरात शहरातील शांती नगर येथे राहणारे मामा लक्ष्मण कटारे यांच्याकडे राहायला आले. मामांनी शेजारी जागा घेऊन दिली. त्या ठिकाणी दोन्ही भावांनी कष्ट करून घर बांधले. बहीण अलका हिने या दोन्ही भावांना मोठ्या बहिणीच्या नात्याने सांभाळून घेतले. तिची इच्छा पोलीस व्हायची होती परंतु काही कारणांमुळे ती पोलीस होऊ शकली नाही. पण तिने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.
विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा देत गेली अखेर तिला यश आले. मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर अलका हीची बुधवार 9 एप्रिल रोजी निवड झाल्याचे पत्र प्राप्त होताच कांबळे आणि कटारे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. अलकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आईच्या अंत्यविधीला तिच्या पार्थिवावर तिने दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे.





