जालना : राज्यात येत्या काही दिवसांमध्ये 9000 हून अधिक होमगार्ड पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. याच धर्तीवर विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
जालना जिल्ह्याच्या विविध पथकातील रिक्त 195 होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे होमगार्ड पदासाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींनी सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन जालना पोलीस दलाकडून करण्यात आलंय.
advertisement
हेही वाचा : अंगावर Tattoo असेल तर मिळत नाही सरकारी नोकरी, पण का? कारण आणि पद जाणून घ्या
नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचा अर्ज https://maharashtracdhg.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि वय 20 ते 50 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तर, पुरुषांची उंची 162 सेंटीमीटर आणि महिलांची उंची 150 सेंटीमीटर असायला हवी.
होमगार्ड पदासाठी 15 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून 17 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण अर्ज करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा, असं आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केलं आहे.