वर्ष 2024-25 या वर्षापासून इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइनद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांनी येत्या 31 मार्चपर्यंत आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइनवर ग्रेस गुणाचे अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी केले आहे.
advertisement
Ration Card e-KYC: तुमच्याकडे शेवटची संधी! अन्यथा मिळणार नाही फ्री रेशन
यात जालना जिल्ह्यातील जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय/स्तरावरील पात्रताधारक खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सरकार पोर्टलवर ऑनलाइनद्वारे भरावयाचे असून कोणत्याही खेळाडूचा ग्रेस गुणाचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही. ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावयाचा असून ऑफलाइन पद्धतीने सादर केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणासाठी 31 मार्च 2025 पूर्वी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी केला आहे.
दरम्यान विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे खेळ प्रकार विद्यार्थ्यांना शिकवले जातात. यामध्ये खो खो, कबड्डी, धावणे, उंच उडी, लांब उडी, हॉलीबॉल, बॅडमिंटन असे खेळ शिकवले जातात. या खेळ प्रकारांमध्ये विद्यार्थी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत देखील जातात. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढण्यात मदत होते. विद्यार्थ्यांचे गुण वाढण्यासाठी ग्रेस गुणांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.