TRENDING:

Banking Jobs: बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी, लगेच करा अर्ज, पात्रता काय?

Last Updated:

Banking Jobs: बँकिंगच्या क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत मेगा भरती निघालीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: बँकिंगच्या क्षेत्रात नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक तरुण प्रयत्न देखील करत असतात. इच्छुक उमेदवारांसाठी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत मेगा भरती निघालीये. स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2025 साठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यामुळे सरकारी बँकेत ऑफिसर होण्याची उत्तम संधी असून लगेच अर्ज करावे लागणार आहेत.
Banking Jobs: बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी, लगेच करा अर्ज, पात्रता काय?
Banking Jobs: बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी, लगेच करा अर्ज, पात्रता काय?
advertisement

या नोकरीसाठी तुम्ही pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 350 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरत लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 पर्यंत असणार आहे.

Womens Day: हसू हरवलेले चेहरे अन् नशिबाच्या फासातील स्त्रिया, बुधवार पेठेतील महिलांची देवदूत

advertisement

कोणत्या पदासाठी किती जागा

1) क्रेडिट ऑफिसर – 250 पदे

2) उद्योग अधिकारी – 75 पदे

3) मॅनेजर-आयटी – 5 पदे

4) वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी – 5 पदे

5) मॅनेजर डेटा सायंटिस्ट – 3 पदे

6) वरिष्ठ व्यवस्थापक डेटा सायंटिस्ट – 2 पदे

7) सायबर सुरक्षा व्यवस्थापक – 5 पदे

advertisement

8) वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा – 5 पदे

अशी असणार शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीई/बी.टेकमध्ये किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. या नोकरीसाठी 21 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 59 शुल्क मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरु शकता.

advertisement

पगार किती?

पंजाब नॅशनल बँकेत क्रेडिट ऑफिसर पदासाठी 48,480 ते 85,920 रुपये पगार मिळणार आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी 48,480 ते 85,920 रुपये पगार मिळणार आहे. सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट पदासाठी 85,920 ते 1,05,280 रुपये पगार मिळणार आहे. सिनियर मॅनेजर पदासाठी 85,920 ते 1,05,280 रुपये पगार मिळणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
Banking Jobs: बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी, लगेच करा अर्ज, पात्रता काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल