TRENDING:

महाराष्ट्रातील 'या' महापालिकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

Last Updated:

अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
महाराष्ट्रातील 'या' महापालिकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज
महाराष्ट्रातील 'या' महापालिकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज
advertisement

पुणे : नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. महाराष्ट्रातील मोठ्या महापालिकेत थेट नोकरीची संधी आपल्यासाठी उपलब्ध होत आहे. नुकतेच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.

कुठं होतेय भरती?

advertisement

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेत ही नोकर भरती होत आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी ही मोठी संधी आहे. उपअभियंता या पदासाठी ही भरती प्रक्रिया होतेय. त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच अर्ज करून 9 जानेवारी 2024 पूर्वी अर्ज संबंधित विभागाकडे जमा करावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, मुख्य इमारत, प्रशासन विभाग, चौथा मजला येथे अर्ज करायचे आहेत.

advertisement

परीक्षेचं टेन्शन सोडा, थेट मुलाखतीतून होणार भरती, लगेच करा अर्ज

भरतीसाठी पात्रता काय?

पिंपरी चिंचवड महापालिकेत होत असणाऱ्या उपअभियंता पदाच्या भरतीसाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी अभियांत्रिकीमध्ये पदवी असणं गरजेचं आहे. आपल्याकडे ही पदवी असल्यास तात्काळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 'या' विभाागात होतेय थेट भरती

advertisement

इथं मिळेल सविस्तर अपडेट

या भरती प्रक्रियेबद्दल आपल्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती मिळेल. त्यामुळे या वेबसाईटला भेट देऊन सविस्तर जाहिरात पाहायची आहे. तसेच त्वरीत अर्ज करायचा आहे.

मराठी बातम्या/करिअर/
महाराष्ट्रातील 'या' महापालिकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल