तसेच राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 अशा प्रकारे प्रसिद्ध झालेलं परिपत्रकावर कोणत्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये. तसेच महाभरती अंतर्गत येणारा हा संदेश कुठेही पसरवू नये, असं आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासनाकडून कळवण्यात आला आहे.
advertisement
काय आहे परिपत्रकामध्ये
राजू महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 अशा मथळ्याखाली महसूल विभागामध्ये कंत्राटी भरती भरवण्यात येणार असल्याचा मजकूर आहे. त्यामध्ये चार जिल्ह्यांमध्ये ही भरती घेण्यात येणार असल्याचं नमूद केले. त्यापैकी पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा समाविष्ट आहे.
यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर 60 पदे , कॉम्प्युटर ऑपरेटर 90 पदे, ड्रायव्हर 22 पदे भरण्यात येणार असल्याचा सांगितलं. तर सातारा जिल्ह्यात डाटा एन्ट्री ऑपरेटर 30 पदे, कॉम्प्युटर ऑपरेटर 50 पदे, ड्रायव्हर 12 पदे, भरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर 29 पदे, कॉम्प्युटरऑपरेटर 35 पदे, ड्रायव्हर नऊ पदे.
रत्नागिरी जिल्ह्यात डाटा एन्ट्री ऑपरेटर 50 पदे कॉम्प्युटर ऑपरेटर 64 पदे आणि ड्रायव्हर 17 पदे.
अशा चार जिल्ह्यांमध्ये महसूल विभागात कंत्राटी भरती घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होतं. यामध्ये अंतिम उमेदवारी अर्ज भरण्याचा दिनांक 15 जानेवारी 2025 आणि 16 जानेवारी 2025 असा देण्यात आलेला होता.
मात्र जिल्हा प्रशासनाकडून या महसूल विभागामध्ये होणाऱ्या कंत्राटी भरतीचे परिपत्रक हे खोटे असून समाज माध्यमांमध्ये व्हायरल होणाऱ्या परिपत्रकावर उमेदवारांनी विश्वास ठेवू नये. तसेच आपल्या जिल्ह्याच्या महसूल विभागात जाऊन चौकशी करून मुलाखती देण्याचा आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.






