सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर सरकारचे भर आहे. जालना जिल्ह्यातील 25 ते 45 वयोगटातील पात्र उमेदवारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी 'होम बेस्ड - हेल्थ केअर गिव्हर्स' म्हणून काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/job-Detail.aspx या लिंकवर नोंदणी करावी.
advertisement
काय आहे पात्रता?
विविध उपक्रमांपैकी एक असलेल्या इस्त्राईल आणि भारत यांच्यातील कराराद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करणे या अंतर्गत देशातील 'होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर्स' यांना इस्त्राईल नॉन वॉर झोनमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्राईलकडून पात्र जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग आणि पोस्ट बीएससी नर्सिंग 5 हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी अधिक सहाय्य व माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आलेय.
दरम्यान, ऑनलाईन अर्ज करून इस्राईलमध्ये नोकरी मिळाल्यास चांगला पगार आणि सुविधा देखील मिळणार आहेत. त्यामुळे गरजू उमेदवारांनी तात्काळ अर्ज करण्याची गरज आहे.






