छत्रपती संभाजीनगर : नुकताच इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. दहावी आणि बारावीनंतर काय करावे? हा अनेक विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो. जर तुम्हाला डिप्लोमामध्ये आवड असेल तर तुम्ही दहावी आणि बारावीनंतर पॉलिटेक्निक अर्थात तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेऊन चांगली नोकरी ही मिळवू शकता. तर यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत किंवा काय नोकरीच्या संधी आहेत? याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय तंत्रशिक्षण विभाग सहसंचालक उमेश नागदेवे यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
कशी आहे प्रवेश प्रकिया?
दहावी आणि बारावीनंतर तुम्ही पॉलिटेक्निकला प्रेवश घेऊ शकता. दहावीनंतर जर तुम्ही पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला तर तुम्हाला तीन वर्षाचा हा कोर्स असतो. म्हणजेच डिप्लोमा असतो. पॉलिटेक्निकसाठी सर्व प्रेवश प्रकिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. तुम्ही पॉलिटेक्निकच्या गव्हर्मेंट वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचा फॉर्म भरू शकता. तसंच तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या एफसीमध्ये जाऊन देखील रजिस्ट्रेशन करू शकता आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. 25 जून पर्यंत हे रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यानंतर यामध्ये मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर प्रेवश प्रकिया सुरू होईल.
शाब्बास पोट्टेहो, NEET परीक्षेत मिळवले पैकीच्या पैकी गुण, नागपूरच्या दोघांची कमाल
यामध्ये तुम्हाला अनेक नोकरीच्या संधी आहेत. तुम्ही कोणताही इंडस्ट्रीमध्ये नोकरी करू शकता. तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. तसंच तुम्ही बारावीनंतर देखील या पॉलिटेक्निकमध्ये प्रेवश घेऊ शकता. तुम्हाला यामध्ये दोन वर्षचा डिप्लोमा हा आहे. बारावीनंतर तरी तुम्ही प्रवेश घेतला तरी देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात नोकरीचा संधी आहेत. त्यासोबतच तुम्ही पुढील शिक्षण देखील घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच, कॉम्प्युटर ब्रांच, सिविल ब्रांच, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, ए आय ब्रांच, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल ब्रांच अशा विविध शाखेमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
नोकरी अन् व्यवसायाची दुहेरी संधी, दहावीनंतर घ्या ITI ला प्रवेश, पाहा संपूर्ण प्रक्रिया
किती आहे फीस?
पॉलिटेक्निकमध्ये तुम्हाला अत्यंत कमी फीस आहे जर तुम्ही ओपनमध्ये येत असेल तर तुम्हाला 7750 एवढी फीस असेल. जर तुम्ही ओबीसी किंवा ईडब्ल्यूएसमध्ये असाल तर तुम्हाला 4750 फीस असेल. एससी, एस्टी, आणि व्हीजेनटीसाठी 1750 एवढी फीस असेल.





