TRENDING:

HSC Exam: फिजिक्सचं टेन्शन सोडा, परीक्षेला जाण्यापूर्वी या ट्रिक्स पाहा अन् पैकीच्या पैकी मार्क मिळवा!

Last Updated:

HSC Exam 2025: लवकरच बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेत फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी खास ट्रिक्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. बारावी बोर्डाची परीक्षा म्हटलं की बहुतांश विद्यार्थ्यांना टेन्शन येतं. त्यात विज्ञान शाखेतील फिजिक्स सारखा विषय म्हटलं की अजून भीती वाटते. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्रासारख्या विषयात पेपर व्यवस्थित सोडवल्यास अगदी पैकीच्या पैकी गुण देखील मिळू शकतात. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक डॉ. किरण पतंगे यांनी काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत.

advertisement

सर्वप्रथम तुम्हाला जेव्हा पेपर दिला जातो, तो तुम्ही व्यवस्थित रित्या वाचून घेणे गरजेचे आहे. पेपर वाचून झाल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न सोपे वाटतात किंवा जे प्रश्न तुम्ही पटापट सोडू शकता ते प्रश्न अगोदर सोडवणे गरजेचे आहे. ते याकरिता की तुम्ही तर जे सोपे प्रश्न अगोदर सोडवले तर जे मोठे प्रश्न असतात ते सोडविण्याकरता तुम्हाला जास्त वेळ हा मिळतो, असं डॉ. पतंगे सांगतात.

advertisement

SSC Exam: इंग्रजीला घाबरायचं नाही! पैकीच्या पैकी गुणांसाठी लक्षात ठेवा सोप्या ट्रिक्स

फिजिक्समध्ये मोठ्या प्रमाणात न्यूमेरिकल्स असतात. याचा तुम्ही भरपूर सराव करणं गरजेचं आहे. कारण 17 ते 18 प्रश्न न्यूमेरिकल्स वरती विचारले जातात. त्याच सोबतच हे न्यूमरिकल्स तुम्ही सोडवताना कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नये. सर्व स्टेप नुसारच तुम्ही हे न्यूमरिकल सोडवणं गरजेचं आहे. याकरिता जर तुम्ही शॉर्टकट पद्धतीने न्यूमेरिकल सोडवले तर या ठिकाणी तुमचे मार्क कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सोडवतना स्टेप बाय स्टेप सोडवावे. तसंच जुन्या प्रश्न पत्रिका किमान दोन वेळेस सोडवणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही प्रश्नपत्रिका दोन वेळेस सोडवल्या तर तुम्हाला पेपर द्यायला खूप सोपं जातं आणि तुमचा भरपूर सराव देखील होतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

बारावी परीक्षेत आणि फिजिक्स विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी पेपर मधले सर्व प्रश्न सोडवणे गरजे आहे. कुठलाच प्रश्न सोडून देऊ नका. सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. अतिशय शांतचित्ताने पेपर लिहाव. कुठलीही घाई गडबड पेपर लिहिताना करू नये. तसेच पेपर अतिशय चांगल्या हस्तक्षेमध्ये आणि चांगली मांडणी करूनच लिहावा. कारण याला देखील मार्क मिळतात. ही तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला फिजिक्स सारख्या अवघड विषयात चांगले मार्क मिळतील, असंही डॉ. पतंगे सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
HSC Exam: फिजिक्सचं टेन्शन सोडा, परीक्षेला जाण्यापूर्वी या ट्रिक्स पाहा अन् पैकीच्या पैकी मार्क मिळवा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल