TRENDING:

रविराजची कमाल! 40 टक्के दृष्टिहीन तरी मिळवले बारावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण, काय आहे यशाचा फॉर्म्युला?

Last Updated:

मनात श्रद्धा आणि समर्पण असेल तर शारीरिक अपंगत्वही ध्येयासाठी गौण ठरते. 40 टक्के दृष्टिहीन असूनही रविराज भोयरने बारावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण मिळवले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
advertisement

नागपूर : मनात श्रद्धा आणि समर्पण असेल तर शारीरिक अपंगत्वही ध्येयासाठी गौण ठरते. 40 टक्के दृष्टिहीन असूनही नागपुरातील डॉ.आंबेडकर कॉलेजमधील वाणिज्य शाखेतील रविराज भोयर या विद्यार्थ्याने महाराष्ट्राराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या कामगिरीचा शालेय परिवार आणि नातेवाईकांना अभिमान वाटत आहे.

advertisement

रात्री दिसत नाही म्हणून केला दिवसा अभ्यास

डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील रविराज भोयर हा 40 टक्के दृष्टिहीन आहे. त्याला वाचण्यात, आकडेवारी बघण्यात अडचण निर्माण होते. रात्री कृत्रिम प्रकाशाच्या झोतात डोळ्यांवर ताण पडतो. म्हणून रविराजने दिवसा अभ्यास केला. जिद्द आणि सातत्याच्या बळावर रविराजने वाणिज्य शाखेत 89 टक्के प्राप्त केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, रविराजला अंधत्वामुळे आकेडवारी दिसण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या आणि याचा परिणाम अत्याधिक आकडेवारी असणाऱ्या अकाउंट्स विषयाच्या अभ्यासावर व्हायचा. मात्र रविराजने प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचा निर्णय घेतला आणि अकाउंट्समध्ये सर्वाधिक 99 गुण प्राप्त केले.

advertisement

दगडच देतो स्वत:ची माहिती, नागपुरात तयार झालं रॉक म्यूझियम, काय आहे यात खास?

रविराजने आपल्या यशाबद्दल माहिती देताना सांगितले की, मी जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेस मला रात्रीच्या वेळी लाईटमुळे त्रास व्हायचा. म्हणून मी रात्री अभ्यास न करता दिवसा अभ्यास करत होतो. ज्यामुळे माझ्या डोळ्यांना कमी त्रास होईल याचा मी नेहमी प्रयत्न करत होतो. मी दर दोन तासाने अभ्यासातून एक ब्रेक घ्यायचो आणि त्यानंतर पुन्हा अभ्यास करायला सुरुवात करायचो कारण सतत पुस्तक वाचल्याने माझ्या डोळ्यांना त्रास व्हायचा. बऱ्याचदा क्लासमध्ये सर शिकवत असताना मला ब्लॅकबोर्ड वर कमी दिसायचं किंवा अंधुक दिसायचं. याप्रकारे क्लासमध्येही मला अडचणींचा सामना करावा लागला तरी अभ्यास करत राहिलो. यामध्ये आईने मला नेहमी मदत केली आहे.

advertisement

बारावी परीक्षेत पुण्याच्या इशिताला 97.33 टक्के गुण, क्लास न लावता कसं मिळवलं यश?

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यावेळी कोकण विभाग 97.71 टक्के गुणांसह राज्यात अव्वल ठरला. नेहमीप्रमाणे यंदाही नागपूर विभागमागे राहिला. विभागाचा एकूण निकाल 92.12 टक्के लागला. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.77 अधिक आहे. गेल्या वर्षी एकूण 90.35 टक्के निकाल लागला होता.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
रविराजची कमाल! 40 टक्के दृष्टिहीन तरी मिळवले बारावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण, काय आहे यशाचा फॉर्म्युला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल