नागपूर : सुवर्ण राजनकर आणि सोहम राजनकर अशी या जुळ्या भावांची नावं. त्यांची आई सौ. पल्लवी राजनकर या गोल्ड मेडलिस्ट. त्या संस्कृत विषयात पीएचडीधारक आहेत. त्यांनीच आपल्या मुलांचा अभ्यास घेतला. दोन्ही मुलांनी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चमध्ये शिकणाऱ्या या दोन्ही जुळ्या भावंडांनी बारावीत घवघवीत यश मिळवलंय. आपल्या यशाचं श्रेय त्यांनी आईला दिलंय. दोघांनीही दिवसभरातून तब्बल 10 ते 12 तास अभ्यास केला. आता पुढे त्यांना बी.टेक करायचंय.
advertisement
हेही वाचा : HSC: दीड महिना पाळला 'तो' 1 नियम आणि मिळवले 100 टक्के, तनिषानं नेमका कसा केला अभ्यास?
या दोन्ही भावांना मागच्या काही वर्षातल्या बारावीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रचंड फायदा झाला. त्यांची आई पल्लवी यांनी सांगितलं की, मी माझ्या अनुभवातून मुलांना शिकवलं. नोट्स कशा बनवायच्या, पुस्तकं कशी वाचायची हे त्यांना सांगितलं. त्यांना माझी त्यांच्याप्रतीची मेहनत लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःला पूर्ण झोकून देऊन अभ्यास केला. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होतीच, हीच आवड आता कामी आली.
दरम्यान, सुवर्ण आणि सोहम या दोघांनीही आईसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षकांचेही आभार मानले. या दोन्ही विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे 93.67% आणि 89% गुण मिळाले आहेत.





