IDBI च्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 86 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. जर तुम्हालाही बँकेत काम करायचे असेल आणि अद्याप या पदांसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी वाचून अर्ज करू शकता.
IDBI साठी अर्जाची फी किती?
सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 भरावे लागतील तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल.
advertisement
आयडीबीआयमध्ये भरली जातायत ही पदं
उपमहाव्यवस्थापक ग्रेड 'डी' - 1 पद (डेप्युटी जनरल मॅनेजर)
सहाय्यक महाव्यवस्थापक ग्रेड 'सी' - 39 पदे (असिस्टंट जनरल मॅनेजर)
व्यवस्थापक - 46 पदे (मॅनेजर)
एकूण पदांची संख्या - 86 पदे
फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे?
अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहेत, त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. यासाठी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
IDBI मध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
IDBI अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी वयोमर्यादा वेगळी आहे. पोस्टनिहाय वयोमर्यादा खाली पाहता येईल.
डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड 'डी' - उमेदवारांचे किमान वय 35 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे.
असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड 'सी' - या पदांसाठी किमान वय 28 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे.
व्यवस्थापक - व्यवस्थापक पदासाठी किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे.
पगार तुम्हाला निवडल्यावर मिळेल
डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड 'डी' - अंदाजे रुपये 1,55,000 प्रति महिना
असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड 'सी' - अंदाजे रुपये 1,28,000 प्रति महिना
व्यवस्थापक - अंदाजे रुपये 98,000 प्रति महिना
अर्ज लिंक आणि सूचना येथे पहा
IDBI भर्ती 2023 साठी अर्ज करण्यासाठी लिंक
निवड अशी असेल
लेखी परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.