वर्ध्यातील शारदा मूकबधिर विद्यालयाच्या सर्व भिंती बोलक्या आहेत. या भिंतींना बोलक्या करण्यामागे शाळेचे माजी विद्यार्थी सुरेश श्रीकृष्ण बोरसरे याचं मोठं योगदान आहे. सुरेश स्वतः जन्मतः मूकबधिर होता. मात्र लहानपणापासून हातात चित्रकला आणि मूर्तिकलेची किमया होती. मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींची त्याला चांगली जाणीव होती. त्यामुळे इतर मुलांचं शिक्षण सोप्पं करण्याचं काम सुरेशनं केलंय.
advertisement
अनाथ मुलीला मिळालं नवं आयुष्य, कसा मिळाला अनुरूप जोडीदार? Video
शाळेत जिकडे बघेल तिकडे शिक्षण मिळेल या उद्देशाने शाळेतील सर्व भिंती रंगविण्यात आल्या आहेत. शारदा मूकबधिर विद्यालयाच्या अध्यक्ष डॉ. उषा फाले, मुख्याध्यापिका ज्योती लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरेशने शाळेच्या सर्व भिंतीवर चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे मूकबधिर मुलांना शिक्षण घेणं सोप्पं झालंय.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरेश सन्मानित
सुरेश मूर्तीकला विषयात पारंगत झाल्याने आज त्याची मूर्तीकला जिल्हा, महाराष्ट्र, देशच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. हॅन्डाक्राफ्ट अवॉर्ड-2022, बांगीया कला प्रतिभा अवॉर्ड-2022, नॅशनल आर्ट एक्सपो चेन्नई-2023, जी-20 राजा रवि वर्मा-2023, इंटरनॅशनल आर्ट एक्झीबिशन-2022 यासारख्या पुरस्कारांनी सुरेशला सन्मानित करण्यात आलंय.
मृत्यूला जिंकणारा माणूस! 4 वेळा अपघात, 108 फ्रॅक्टर अन् 110 टाके, अंगावर काटा आणणारा संघर्ष
कलेवर चालतोय कुटुंबाचा उदरनिर्वाह
कुंभार कुटुंबात जन्म झाल्यामुळे सुरेश यांच्या हातात लहानपणी पासून मूर्तिकला, चित्रकला आहे. त्यामुळे वयानुसार चित्रकलेची प्रसिद्धी देखील वाढत गेली. सध्या सुरेशची वर्ध्यातील प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ओळख आहे. याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. आई-वडिलांसह पत्नी, मुलगी असा परिवार आहे. कलेच्या जोरावर चांगली मिळकत असून यंदा नवरात्रोत्सवात सुरेश यांनी 1 लाखांपेक्षा जास्त रूपयांचा नफा मिळविला असल्याचं ते सांगतात. त्यांनी आपल्या वाटचालीतून ‘इच्छा तिथे मार्ग...’ ही शिकवण नव्या पिढीला दिली आहे.