TRENDING:

Mini MBA Course: नोकरीबरोबरच सहा महिन्यांत पूर्ण करा एमबीए अभ्यासक्रम; फी 10 हजारांपेक्षा कमी अन् पगार लाखांत

Last Updated:

आता कम्युनिकेशन, पत्रकारिता, शैक्षणिक, एचआर, आयटी आदी क्षेत्रांशी निगडित लोकही एमबीए अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली - एमबीए म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन नावाचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या नावावरून असं दिसतं की, हा कोर्स फक्त व्यावसायिक क्षेत्रात असलेल्यांसाठीच तयार केला गेला असावा. पण, प्रत्यक्षात तसं नाही. आता कम्युनिकेशन, पत्रकारिता, शैक्षणिक, एचआर, आयटी आदी क्षेत्रांशी निगडित लोकही एमबीए अभ्यासक्रमाला प्राधान्य देत आहेत.
MBA
MBA
advertisement

एमबीए हा दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. नियमित(रेग्युलर), ऑनलाइन किंवा दूरस्थ (डिस्टंट) पद्धतीनं तो पूर्ण केला जाऊ शकतो. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. नोकरीसोबतच तुम्ही हा कोर्स वीकेंड किंवा ऑनलाइन स्टडी मटेरियलच्या माध्यमातूनही करू शकता. त्याची फी मात्र, लाखो रुपयांत आहे. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्ही त्यासाठी एक किंवा दोन वर्षं वेळ देऊ शकत नसाल, तर मिनी एमबीए कोर्स हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल.

advertisement

मिनी एमबीए कोर्स म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, मिनी एमबीए ही पूर्णवेळ एमबीए प्रोग्रॅमची एक छोटी आवृत्ती आहे. याला एक प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रमदेखील म्हणता येईल. जर तुम्ही नोकरी करत असताना एमबीए करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय उत्तम ठरेल. पूर्णवेळ एमबीए प्रोग्रॅमच्या तुलनेत याची फी देखील कमी आहे. 6 महिने ते 1 वर्षांच्या काळात हा कोर्स पूर्ण होतो. अनेक ठिकाणी त्याचा कालावधी काही आठवड्यांपासून दोन महिन्यांपर्यंतही ठेवण्यात आला आहे.

advertisement

15 व्या वर्षी 300 रुपये घेऊन घराबाहेर पडली अन् आज कोट्यवधीची मालकीण

मिनी एमबीए कोण करू शकतं?

जर तुम्हाला मिनी एमबीए कोर्स करायचा असेल पण तरीही त्याबद्दल खात्री नसेल, तर हा कोर्स कोणासाठी डिझाईन केलेला आहे हे अगोदर समजून घ्या,

1) ज्यांना आपलं काम सुरू करण्यापूर्वी व्यावसायिक जगातील मूलभूत गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घ्यायच्या आहेत, अशा व्यक्ती मिनी एमबीए करू शकतात.

advertisement

2) ज्या व्यवस्थापकांना करिअरच्या वाढीसाठी त्यांच्या क्षेत्रातील व्यवसायाशी संबंधित तपशील सखोल समजून घ्यायचे आहेत, ते हा कोर्स करू शकतात.

3) ज्या तरुणांना कमी पैशात आणि कमी वेळेत एमबीए करून एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मूलभूत गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, तेही हा कोर्स करू शकतात.

विदेशात सहज मिळतात नोकऱ्या, पैसाही मिळतो भरपूर; एका नोकरीत तर कोट्यवधींचं पॅकेज

advertisement

मिनी एमबीएमध्ये कोणत्या प्रकारचे कोर्सेस आहेत?

तुमचा वेळ आणि पैसे वाचवून जर तुम्हाला एमबीए करायचं असेल तर तुम्ही खाली नमूद केलेल्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. पण, लक्षात ठेवा की, मिनी एमबीए कोर्स केल्यानंतर, तुम्हाला कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र मिळणार नाही. काही आठवडे किंवा महिन्यांच्या या अभ्यासक्रमाच्या बदल्यात उमेदवारांना एक प्रमाणपत्र दिलं जातं.

1) इसेन्शियल मॅनेजमेंट स्किल्स

2) मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्स

3) इंटरनॅशनल बिझनेस

4) स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स

5) फायानान्स अँड अकाउंटिंग

6) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट

व्हिडिओमधूनही करू शकता अभ्यास

भारतातील अनेक ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्सनी मिनी एमबीए प्रोग्रॅमही सुरू केले आहेत. त्यांची फी चार हजार ते आठ हजार रुपये आहे. काही ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म व्हिडिओद्वारे हा प्रोग्रॅम चालवत आहेत. युडेमीच्या अशाच एका प्रोग्रॅमची फी फक्त 1280 रुपये आहे. या कोर्सचा कालावधी फक्त 6 तासांचा आहे.

मराठी बातम्या/करिअर/
Mini MBA Course: नोकरीबरोबरच सहा महिन्यांत पूर्ण करा एमबीए अभ्यासक्रम; फी 10 हजारांपेक्षा कमी अन् पगार लाखांत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल