15 व्या वर्षी 300 रुपये घेऊन घराबाहेर पडली अन् आज कोट्यवधीची मालकीण

Last Updated:

15 वर्षांच्या असताना घरातून पळून गेलेल्या चिनू यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली व आज त्या 100 कोटी रुपयांची कंपनी चालवत आहेत. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास.

चीनू
चीनू
मुंबई : अनुभव हा खूप मोठा गुरू असतो. आयुष्यात शिक्षणाइतकाच अनुभवही खूप काही शिकवून जातो. सध्या अब्जाधीश असलेल्या चिनू काला यांनाही त्यांच्या अनुभवानंच मोठं केलंय. दिवसाला 20 रुपये कमवण्यापासून ते 8 कोटी रुपये वर्षाला कमवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. महिला व्यावसायिक म्हणून आज त्या नावारूपाला आल्या आहेत. 15 वर्षांच्या असताना घरातून पळून गेलेल्या चिनू यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली व आज त्या 100 कोटी रुपयांची कंपनी चालवत आहेत. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास.
स्वप्न खरं करायचं ठरवलं तर मनात जिद्द हवी. यशस्वी महिला व्यावसायिक चिनू काला यांनी जिद्दीच्याच जोरावर अब्जाधीश होण्यापर्यंत मजल मारली आहे. चिनू केवळ 15 वर्षांच्या होत्या, तेव्हा घरातून 300 रुपये घेऊन त्या बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांना सेल्सगर्ल म्हणून काम मिळालं. दारोदारी जाऊन सुरी-चाकू विकायचं काम त्या करू लागल्या. यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना थोडी मदत झाली. मात्र त्यांना ही नोकरी मिळाली नसती, तर दोन वेळचं जेवायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते.
advertisement
सेल्सगर्ल म्हणून काम करताना त्यांना लोकांची मानसिकता लक्षात आली. ग्राहकांना जे हवं आहे, ते पुरवणं हे मुख्य काम असतं व ते फारसं अवघड नसतं, हे त्यांना कळालं. 2004 मध्ये त्यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. तिथे त्यांना दागिन्यांचं महत्त्व लक्षात आलं.
advertisement
त्यानंतर त्यांनी व्यवसायातली त्यांची समज आणि दागिन्यांचं बाजारातलं महत्त्व या दोन्हीची सांगड घालून स्वतःचा एक दागिन्यांचा ब्रँड तयार केला. त्या ब्रँडचं नाव रुबन्स अ‍ॅक्सेसरीज असं ठेवलं. दागिन्यांचा ब्रँड तयार करण्याचं अनेक वर्षं त्यांच्या मनात होतं, अखेर त्यांनी 2014 मध्ये त्याला मूर्त स्वरूप दिलं.
advertisement
सगळ्या व्यवसायात येतात, त्याप्रमाणे त्यांनाही सुरुवातीला अडचणी आल्या. त्यांना मॉलमध्ये जागाही मिळत नव्हती. त्यासाठी 3 वर्षं थांबावं लागेल, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांच्या दुकानासाठी डिपॉझिट म्हणून खूप मोठ्या रकमेची मागणी त्यांना करण्यात आली. त्यावर दुकान सुरू झाल्यावर एक महिन्यापर्यंतचा अवधी डिपॉझिट देण्यासाठी त्यांनी मागितला.
त्यांचं दुकान उघडताक्षणीच त्यांच्या ब्रँडची चांगली विक्री होऊ लागली. पुढच्याच महिन्यात इतकी चांगली विक्री झाली की त्या सहज डिपॉझिटची रक्कम देऊ शकल्या. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आज त्यांच्या कंपनीची किंमत एक अब्ज रुपयांच्या आसपास आहे. त्यांची उत्पादनं दुकानांव्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या ऑनलाइन खरेदी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/करिअर/
15 व्या वर्षी 300 रुपये घेऊन घराबाहेर पडली अन् आज कोट्यवधीची मालकीण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement