TRENDING:

MPSC 2022 चा फायनल रिझल्ट आला! विनायक पाटील राज्यात पहिला; तुमचा क्रमांक कितवा इथं पाहा

Last Updated:

एमपीएससी 2022 परीक्षेच्या मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत फुंदे/मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एमपीएससी 2022 ची मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. 18 जानेवारी 2023  गुरुवारीच परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला आहे.
विनायक पाटील
विनायक पाटील
advertisement

एमपीएससी 2022 ची ही भरती एकूण 613 पदांसाठी होती. उपजिल्हाधिकारी, डीव्हायएसपी तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या परीक्षेत विनायक पाटीलनं बाजी मारली आहे. विनायक पाटीलनं पहिला क्रमांक पटकावला आहे. विनायक पाटील राज्यात पहिला आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विनायक पाटीलला 622 गुण मिळाले आहेत. तर धनंजय पाटील 608 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींंमध्ये पूजा वंजारी पहिली आली आहे. तिला 570.25 गुण मिळाले आहेत.

advertisement

Success Story : वडिलांचं छोटसं किराणा दुकान, मुलगी आधी इंजिनियर नंतर आयएएस; असा आहे यशाचा फॉर्म्युला

तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींनी ही परीक्षा दिली असेल तर त्यांचं या यादीत नाव आहे का? संपूर्ण निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

मराठी बातम्या/करिअर/
MPSC 2022 चा फायनल रिझल्ट आला! विनायक पाटील राज्यात पहिला; तुमचा क्रमांक कितवा इथं पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल