TRENDING:

चहा विक्रेत्याची मुलगी बनली पहिल्याच प्रयत्नात PSI, सेल्फ स्टडी करून कसं मिळवलं यश? Video

Last Updated:

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पीएसआय पदाचा निकाल लागला. या निकालात नेहा पहिल्याच प्रयत्नात पीएसआय म्हणून उत्तीर्ण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
advertisement

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण शासकीय नोकरी करावी. पण शासकीय नोकरी करण्यासाठी मेहनत आणि अभ्यासाची जोड असावी लागते.  याच मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावरती छत्रपती संभाजीनगर शहरातील नेहा कदम ही पीएसआय झाली आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पीएसआय पदाचा निकाल लागला. या निकालात नेहा पहिल्याच प्रयत्नात पीएसआय म्हणून उत्तीर्ण झाली आहे.

advertisement

कुठं झालं शिक्षण? 

नेहा बालासाहेब कदम ही मूळची परभणी जिल्ह्यातील पालम येथील आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबियासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते. नेहाची आई ही गृहिणी आहे. तर वडील चहाची एक छोटीच टपरी चालवतात. नेहाच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे परभणी येथे पूर्ण झालं. त्यानंतर तिने अकरावी, बारावी आणि तिचे पदवीचे शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर शहरातून पूर्ण केलं. नेहाचे आयटी इंजीनिअरिंगमध्ये शिक्षण झालेलं आहे.

advertisement

inspiring story : वडील वॉचमन, आईसह तिनेही केली लोकांच्या घरची धुणीभांडी, पण न खचता आज सीमा बनली PSI

कसं मिळवलं यश? 

माझी जेव्हा डिग्री पूर्ण होत आली होती तेव्हा मला नोकरीला लागायची संधी होती. पण मला शासकीय नोकरी करण्याची अगदी लहानपणापासून आवड होती. त्यामुळे मी डिग्री झाल्यानंतर माझा एमपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घरच्यांना कळवला. पण घरची परिस्थिती ही अत्यंत हलाकीची असल्यामुळे घरून पाठींबा मिळेल का नाही ही भिती मनात होती. पण घरी सांगितल्यानंतर वडिलांनी होकार दिला. आणि त्यानंतर मी एमपीएससीची तयारी करायला सुरुवात केली. एक-दोन महिने हे क्लास केले पण त्यानंतर लॉकडाऊन पडलं आणि त्यानंतर मी माझी सेल्फ स्टडी करायला सुरुवात केली, असं नेहा सांगते.

advertisement

मी जेव्हा एमपीएससीची तयारी करायला सुरुवात केली. तेव्हा मला सर्वात मोठी अडचण ही होती की माझे शिक्षण सायन्समध्ये झालेले होते. एमपीएससीला जे विषय होते ते आर्ट्सच्या संदर्भात होते. त्यामुळे तिथे मला तयारी करताना थोडीशी अडचण आली. पण मी मन लावून अभ्यास केला. दररोज 8 ते 10 तास मी अभ्यास करायचे. हा माझा एमपीएससी देण्याचा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश देखील मिळालं. मी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली त्यामध्ये पास झाले. आणि त्यानंतर मी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागले. मी मुख्य परीक्षेच्या अगदी मन लावून अभ्यास केला. त्यामध्ये देखील पास झाले,असं नेहा सांगते.

advertisement

आईनं सोनं ठेवलं, लेकीनं पांग फेडलं! भाजी विक्रेत्याच्या मुलीचं UPSC परीक्षेत यश, Video

मुख्य आणि पूर्व परीक्षानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे ग्राऊंडचा. माझे शिक्षक रेड्डी सर यांनी माझ्याकडून संपूर्ण ग्राऊंडचा सराव करून घेतला. अगदी सर्व तयारी त्यांनी स्वतः लक्ष देऊन माझ्याकडून करून घेतली. मी जेव्हा ग्राऊंड देत होते तेव्हा आमच्या वेळेस ग्राऊंडचे मुलींसाठी नियम हे बदलले होते. त्यामुळे ग्राऊंड हे जरा अवघड होतं. मी त्यामध्ये उत्तीर्ण झाले. यानंतर माझा इंटरव्ह्यू होता. मी इंटरव्ह्यूसाठी अगदी चांगल्या रितीने तयारी केली. आणि सर्व मुला-मुलींमधून मला सेकंड हायस्ट मार्क या इंटरव्ह्यूमध्ये भेटले. जेव्हा इंटरव्ह्यू दिला तेव्हा मला तो चांगला गेला आणि मला आत्मविश्वास होता की मी यामध्ये पास होईल. यानंतर मी दुसऱ्या परीक्षेच्या तयारीला लागले आणि आत्ताच काही दिवसापूर्वी जो निकाल जाहीर झालाय. त्यामध्ये मी पास झाले याचा मला खूप आनंद झाला आहे. आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देते, असंही नेहाने सांगितले आहे.

4 वेळा अपयश पण तो खचला नाही, UPSC परीक्षेत पुणेकर शुभमनं बाजी मारलीच! Video

मुलीचा सार्थ अभिमान

माझ्या मुलीने जे करून दाखवले त्याचा मला सार्थ अभिमान आहे. अशी मुलगी सर्वांना भेटायला पाहिजे. तिने आज आमच्या कष्टाचे चीज हे केलेलं आहे. त्यामुळे एक आई म्हणून मला तिचा अभिमान आहे, असं नेहाची आई जयश्री कदम यांनी सांगितले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

नेहा लहानपणापासूनच अत्यंत शांत स्वभावाची आहे. तिने कधीही कोणत्या गोष्टीसाठी हट्ट नाही केला कारण तिला आमच्या घरातली परिस्थिती माहीत होती आणि आज ती पीएसआय झालेली आहे. एक वडील म्हणून मला तिचा खूप अभिमान आहे, असं नेहाचे वडील बालासाहेब कदम यांनी सांगितले .

मराठी बातम्या/करिअर/
चहा विक्रेत्याची मुलगी बनली पहिल्याच प्रयत्नात PSI, सेल्फ स्टडी करून कसं मिळवलं यश? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल