नागपूर: दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांमध्ये झटपट नोकरीसाठी लोकप्रिय असलेल्या 'आयटीआय'ला आजही तेवढीच मागणी आहे. बदलत्या ट्रेंडनुसार कौशल्य विकासाला महत्त्व आल्यामुळे मध्यमवर्गीय व श्रीमंत विद्यार्थीसुद्धा आयटीआयला प्राधान्य देत आहेत. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून एअरोनॉटिकलसह नवीन ट्रेंडमध्येही प्रवेशासाठी विद्यार्थी पसंती देत आहेत.
advertisement
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
जिल्ह्यातील सर्व आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी लागल्यानंतरच प्रवेश निश्चित होतील. सोबतच या लिंक वर https://admission.dvet.gov.in/ आपण नोंदणी करू शकता. याबाबत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरचे उप संचालक अंनत सोमकुंवर यांनी माहिती दिलीय.
गोर गरिबांसाठी 1 रुपयात शिक्षण, नागपुरातील तरुणाने सुरु झालं कॉन्व्हेंट स्कूल
आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक काय?
1) 3 ते 30 जून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे.
2) 5 जून ते 1 जुलै : अर्ज स्वीकृती केंद्रात (शासकीय किंवा खासगी आयटीआय) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे.
3) 5 जून ते 2 जुलै : पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय प्राधान्य सादर करणे.
4) 4 जुलै प्राथमिक गुणवत्तायादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे.
5) 4 ते 5 जुलै : गुणवत्तायादीबाबत हरकती नोंदविणे.
6) 7 जुलै : अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध करणे.
7) 14 जुलै ते 24 ऑगस्ट : पहिली ते चौथी प्रवेश फेरी.
8) 17 जुलै ते 24 ऑगस्ट : नव्याने प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चित करणे.
9) 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट संस्थास्तरीय समुपदेशन फेरी.
नोकरी अन् व्यवसायाची गोल्डन संधी, बारावीनंतर घ्या 'होम सायन्स'चं शिक्षण
दरम्यान, एअरोनॉटिक्स, ड्रोन, रोबोटिक्स असे नवनवे कालसुसंगत कोर्सेसमुळे विद्यार्थी अधिकच आयटीआयकडे वळले आहेत. आयटीआय अभ्यासक्रम पूर्णपणे औद्योगिक क्षेत्राशी जुळला आहे. कोणत्याही औद्योगिक कंपन्यांमध्ये 15 ते 50 हजारांपर्यंतचा जॉब सहज मिळू शकतो. स्टार्टअपद्वारे उद्योग करण्याचे कौशल्यही आत्मसात करता येते. त्यामुळे आजच्या काळासाठी आयटीआय हा शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरला आहे, असे सोमकुंवर यांनी सांगितलं आहे.