एनआयएसीएलने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. फी जमा करण्याची शेवटची तारीखही 15 फेब्रुवारी आहे. अशा परिस्थिती उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
NIACL Recruitment साठी अर्ज करण्याच्या स्टेप्स
advertisement
- या पदासांठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना newindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
- वेबसाइटच्या होम पेजवर latest updates च्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर New India Assurance NIACL Assistant Recruitment 2024 Apply Online या लिंकवर क्लिक करा.
- पुढील पेजवर 'Apply Online' या ऑप्शनवर जा.
- तिथे मागितलेले डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करा.
- रजिस्ट्रेशन केल्यावर लॉग इन करा आणि अर्ज पूर्ण भरा.
- अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट न विसरता घ्या.
घरात 'या' ठिकाणी कापराचा तुकडा ठेवणं फायद्याचं, येणार नाही पैशांची अडचण
सरकारी नोकरीतील या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया फी जमा केल्यानंतरच पूर्ण केली जाईल. यामध्ये सामान्य कॅटेगरी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना फी म्हणून 850 रुपये भरावे लागतील. या शिवाय एससी आणि एसटीसाठी 100 रुपये फी आहे. ही फी ऑनलाइन पद्धतीने भरता येते.
कोण करू शकतं अर्ज?
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडने (NIACL) प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. त्यांनी बीए, बीकॉम किंवा बीएससी डिग्री पूर्ण केलेली असावी.
पगार किती मिळणार
असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांची निवड तीन स्तरीय परीक्षेद्वारे केली जाईल. यातील पहिला पेपर 2 मार्च 2024 रोजी होणार आहे. यामध्ये निवड झालेल्यांना दुसरा पेपर द्यावा लागेल. या पदांसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 70,000 रुपयांपेक्षा जास्त पगार मिळेल. या शिवाय इतर सरकारी भत्त्यांचे लाभही मिळतील.
