TRENDING:

मोदी मंत्रानं बदललं आयुष्य! ‘परीक्षा पे चर्चा’तून प्रेरणा, सोलापूरच्या साक्षीला थेट पंतप्रधानांचं पत्र

Last Updated:

Pariksha Pe Charcha: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळे सोलापुरातील विद्यार्थिनीचं आयुष्यच बदललं. आता पंतप्रधानांनीच थेट साक्षी कुरणे हिला पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर - भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष असते. म्हणून त्यांनी 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम देशभरात राबविला होता. याच उपक्रमामुळे सोलापुरातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे आयुष्य बदलून टाकले. आरोग्याच्या समस्येशी झुंजणाऱ्या साक्षी जिनेंद्र सुराणा हिला पंतप्रधान मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे तिने उत्तुंग यश प्राप्त केलं. याबाबत साक्षीने पंतप्रधान मोदींना आभार मानले होते. आता खुद्द पंतप्रधान मोदींनी साक्षीला पत्र लिहून तिचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

advertisement

सोलापुरातील साक्षी सुराणा हिला बारावीच्या परीक्षेच्या दोन महिनेअगोदर तिला गंभीर आजार असल्याचे समजले. मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्यांच्या समस्येमुळे साक्षीला एक भीती निर्माण झाली होती. वेळेवर सर्व पेपर कव्हर होईल का? याबाबत देखील ती साशंक होती. पण'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम पाहून साक्षीला प्रेरणा मिळाली. तिने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तसेच ती महाविद्यालयात अव्वल आली. या प्रेरणेतूनच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्राला खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच प्रतिसाद दिला आहे, असं साक्षीनं सांगितलं.

advertisement

पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी साक्षीच्या भेटीला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी डिसेंबरमध्ये साक्षीच्या भेटीसाठी सोलापुरात आले होते. त्यांनी साक्षी शिकत असलेल्या डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स येथे भेट दिली. तिथे जाऊन साक्षीला शुभेच्छा दिल्या. तसेच ती अभ्यास कसा करते? तिला कशाची आवड आहे? पुढे जाऊन ती काय करील? यासह 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम तिला का आवडला? यासंबंधीची माहिती घेतली. तसेच साक्षीच्या आवडी - निवडीं विषयी माहिती घेतली आणि कुटुंबीयांशी देखील चर्चा केल्याची माहिती साक्षी सुराणा हिने दिलीये.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
मोदी मंत्रानं बदललं आयुष्य! ‘परीक्षा पे चर्चा’तून प्रेरणा, सोलापूरच्या साक्षीला थेट पंतप्रधानांचं पत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल