नोंदणी करण्यासाठी इच्छुक उमेदवार RVNL.ORG या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आरव्हीएनएलद्वारे जारी केलेल्या असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करिअर विभागात दिलेल्या सक्रिय लिंकवर क्लिक करू शकतात. तिथे दिसणारा ऑनलाइन अर्ज भरून उमेदवारांनी अर्जाची प्रिंटआउट घ्यावी. त्यानंतर हा ऑनलाइन अर्ज, जाहिरातीत दिलेल्या आयडीवर ईमेल करावा लागेल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावं की प्रत्येक पोस्टसाठी स्वतंत्र ईमेल आयडी जारी केले आहेत. उमेदवारांना त्यांच्या पोस्टनुसार ईमेल आयडीवर मेल पाठवा लागेल, 'टीव्ही 9 भारतवर्ष'ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
(8th Pay Commission बद्दल मोठी अपडेट, पुढील वर्षी मिळू शकतो आठव्या वेतन आयोगानुसार पगार!)
पात्रता
सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि एस अँड टी विभागांमध्ये मॅनेजरची एकूण 9 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, डेप्युटी मॅनेजरच्या 16 आणि असिस्टंट मॅनेजरच्या 25 जागांसह एकूण 50 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवाराला संबंधित स्ट्रीममधील पदवी परिक्षेत किमान 50 टक्के गुण असणं बंधनकारक आहे. असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. तसेच डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.
मॅनेजर पदांसाठी किमान 9 वर्षांचा अनुभव असावा. मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं 1 ऑक्टोबर 2023 रोजी वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावं. असिस्टंट आणि डेप्युटी मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 35 वर्षे असावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
वेतन
मॅनेजर पदी निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 रुपये ते 1,60,000 रुपये वेतन दिलं जाईल. तसेच, डेप्युटी मॅनेजरसाठी 40,000 ते 1,40,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल तर असिस्टंट मॅनेजरला 30,000 ते 1,20,000 रुपये पगार देण्याची तरतूद आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.