TRENDING:

शेवटी पोरांन करून दाखवलं, आई-बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, कोल्हापूरच्या रोहितची ISROच्या शास्त्रज्ञपदी निवड

Last Updated:

रोहित हा एका शेतकरी, कष्टकरी कुटुंबात वाढलेला तरुण आहे. त्यानं शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वाकड जाण्यासाठी त्यानं अपार कष्ट केले आणि शेवटी हे करून दाखवलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, कोल्हापूर
advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील मालवे गाव. हे गाव तसं आडवळणाचं इथं साधी एसटी ही तुरळक प्रमाणातच येते. अशा गावच्या एका तरुणाने आपल्या आई-बापाच्या कष्टाचं चीज करून दाखवलं. ही गोष्ट आहे मालवे गावामध्ये राहणाऱ्या रोहित पाटील याची. रोहित हा एका शेतकरी, कष्टकरी कुटुंबात वाढलेला तरुण आहे. त्यानं शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वाकड जाण्यासाठी त्यानं अपार कष्ट केले आणि शेवटी हे करून दाखवलं. नुकतीच त्याची इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञपदी निवड झाली आहे. रोहितने आपल्या अंगी असलेली प्रचंड चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन केलय.

advertisement

रोहितचा शैक्षणिक प्रवास

राधानगरी तालुक्यातील मालवे इथं राहणाऱ्या रोहित लक्ष्मण पाटील याने आपलं प्राथमिक शिक्षण मालवे विद्यामंदिर, बोरवडे हायस्कूल आणि किसनराव मोरे हायस्कूल सरवडे इथं पूर्ण केलं. त्यानंतर त्यान गारगोटी इथं असणाऱ्या आयसीआय कॉलेजमधून इंजिनिअर डिप्लोमा पूर्ण केला. पुढच्या शिक्षणासाठी तो इचलकरंजीमध्ये असणाऱ्या शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर त्यांना काही काळ एका शिरवळमधील कंपनीमध्ये नोकरी केली ही नोकरी करत असतानाच त्याला स्पर्धा परीक्षेची गोडी लागली.

advertisement

या स्पर्धा परीक्षेत त्यांना यश मिळवत ऑइल अँड नॅचरल गॅस या केंद्र सरकारच्या कंपनीमध्ये तो असिस्टंट इंजिनिअर पदी रुजू झाला. मात्र तो इथवर थांबला नाही, त्यांन आपला अभ्यास चालूच ठेवला. ही नोकरी करत असताना त्यानं इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञपदी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा दिली. पहिला प्रयत्न त्याला यश आलं नाही. मात्र दुसऱ्यांदा जोमान अभ्यास केला आणि अखेर त्यांना यशाला गवसणी घातली.

advertisement

सर्वत्र होतय कौतुक

येरवी ग्रामीण भागासह शहरी भागातील तरुण शेती, डॉक्टर, आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करण, एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण, असा पेशा निवडतात. मात्र राधानगरीतील मालवे गावच्या तरुणान शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न उरी बाळगलं. आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांनीही अपार कष्ट केले.

आई-वडिलांची लाखमोलाची साथ 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

रोहित हा कष्टकरी वर्गातील तरुण आहे. त्याचा आई-वडील शेतकरी, त्यांची परिस्थिती ही तशी बेताचीच. मात्र रोहित न जे स्वप्न उरी बाळगलं होतं. त्याला त्याच्या आई-वडिलांनी लाखमोलाची साथ दिली. कितीही काबाडकष्ट करावे लागू दे, कितीही आर्थिक संकट येऊ देत, मात्र आपला मुलगा हा मोठा अधिकारी व्हावा असा स्वप्न त्यांच्या आई-वडिलांच होत. आईवडिलांनी घेतलेल कष्ट आणि त्याला सार्थकी उतरलेला रोहित, हे पाहून रोहितच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
शेवटी पोरांन करून दाखवलं, आई-बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, कोल्हापूरच्या रोहितची ISROच्या शास्त्रज्ञपदी निवड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल