योजनेचा उद्देश काय?
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
advertisement
कशी करायची नोंदणी?
गरजू दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करता येणार आहे. अर्जदारांची नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेसाठी कागदपत्रे
दिव्यांगांसाठीच्या ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ या लाभासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंक पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशन अथवा मतदानकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड ही कागदपत्रे लागणार आहेत.