सृष्टीचं यश अधिकच उल्लेखनीय ठरतं कारण तिनं कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता फक्त लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला. ती दिवसातून 12 ते 14 तास सातत्याने अभ्यास करत असे. ती रामनारायण रुईया कॉलेजमधून आर्ट्समध्ये पदवीधर असून, हा तिचा UPSC चा दुसरा प्रयत्न होता. दहावीला तिला 92 टक्के गुण मिळाले होते.
दोन वर्ष नोकरी मग दिला राजीनामा, साताऱ्याच्या संकेतनं अखेर UPSC परीक्षेत मिळवलं यश, Video
advertisement
सृष्टीचे वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात तर आई गृहिणी आहे. मानखुर्दच्या शिवशक्ती चाळीत वाढलेल्या सृष्टीला एम. पवार लायब्ररीत मिळालेल्या अभ्यासाच्या शांततेने आणि पालकांच्या पाठिंब्याने हे यश मिळवता आलं, असं ती नमूद करते.
आपली लेक परीक्षा पास झाली, या आनंदाचे अश्रू सृष्टीच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. हे दृश्य कुणाच्याही डोळ्यांत पाणी आणणारे होतं. आज 25 वर्षांची सृष्टी जेव्हा कामावर रुजू होईल, तेव्हा आपल्या सारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी काम करणं, ही तिची प्राथमिकता असेल असं ती सांगते. तिचं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.