आकाश गोरे हा भाटेपुरी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरी दहा ते बारा एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. आकाश गोरे याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शारदा विद्या मंदिर हायस्कूल गेवराई बीड येथे झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील शाहू महाविद्यालयात झालं. तर एमबीबीएसचे शिक्षण त्याने मुंबई येथील के इ एम महाविद्यालयात केलं.
advertisement
यानंतर महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा देऊन आयपीएस पद मिळवलं होतं. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याने देखील यूपीएससी करण्याचं ठरवलं. दिल्ली येथे जाऊन काटेकोर अभ्यास करण्यास सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोचला होता. परंतु यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने योग्य प्रकारे अभ्यासाचे नियोजन करून देशभरातून 500 वा रँक मिळवला. आकाश गोरे यांनी मिळवलेल्या या विषयाबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून त्याचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. सर्वसामान्य शेतकरी मुलांसाठी आकाश गोरे आदर्श ठरला आहे.