वर्धा: आजकालच्या चिमुकल्यांमध्ये कोणता छंद जडेल आणि तोच छंद कधी जागतिक पातळीवर ओळख बनेल काही सांगता येत नाही. असाच एक विक्रम वर्ध्यातील अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने केलाय. चार्वी गरपाळ असं या चिमुकलीचं नाव असून तिच्यातील कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. "पर्यावरण श्लोक माला" या विषयावर चार्वीने संस्कृत भाषेत 52 श्लोक व त्याचा हिंदीमध्ये अनुवाद करून 'यू ट्यूब चॅनल'वर टाकले आहे. तसेच 'पर्यावरण श्लोक माला' या नावाचे पहिले पुस्तक 26 जानेवारी रोजी प्रकाशित होत आहे. यात चार्वीच्या सर्व श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे.
advertisement
चार्वीने तयार केले 52 व्हीडिओ
या पुस्तकातील सर्व श्लोकांचे चार्वी गरपाळ हिने 52 व्हिडिओ तयार केले आणि बोधिसत्व खंडेराव 'यू ट्यूब चॅनल' वर अपलोड केले. पाच महिन्याच्या आत 52 व्हिडिओ अपलोड करून तिने एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे. सर्व संस्कृत श्लोकांचे उच्चार शिकविण्यासाठी अमृता खंडेराव यांनी चार्वीला मार्गदर्शन केले आहे. कुंदा हळबे आणि डॉ. गणेश खंडेराव यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
Ram Mandir: पंतप्रधानांनी केलं हे पुण्याचं काम, विदर्भाच्या बहिणाबाईंची कविता ऐकली का? Video
चार्वीचा मुलांना संदेश
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व्हावं हे माझं टार्गेट नव्हतं. तर माझ्या वयातील मुलांना पर्यावरणाचे महत्त्व कळावं आणि पर्यावरणात त्यांनीही काहीतरी काम करावं. हा संदेश मला त्यांना द्यायचा होता, अशी भावना चार्वीने व्यक्त केली.
Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मच्छीमार जाणार, या दाम्पत्याला खास निमंत्रण, Video
इतरही कलांमध्ये चार्वी पारंगत
चार्वी गरपाळ ही 'नृत्य, गायन, खेळ, पाठांतर, योगाभ्यास, जिम्नॅस्टिक, नाट्यकला तसेच ऑलिम्पक स्पर्धा परीक्षा अशा अनेक विषयात पारंगत आहे. आजपर्यंत तिने अभ्यासाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये प्राविण्य आणि बक्षिसे मिळविली आहेत. सध्या ती सक्षम इंग्लिश मीडियम स्कूल- वर्धा या शाळेत पाचव्या वर्गात शिकत आहे. चार्वीच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चार्वी गरपाळ या विद्यार्थिनीने 'पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल' जगातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ही बाब विदर्भवासियांसाठी कौतुकास्पद ठरली आहे.