आरआरबी एनटीपीसीद्वारे, 12वी पाससाठी ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट, अकाऊंटंट कम टायपिस्ट, ज्युनिअर टाईम कीपर, ट्रेन क्लार्क, कमर्शिअल कम तिकीट क्लार्क या पदांसाठी भरती केली जाते. तर पदवी असलेल्यांसाठी ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सीनियर क्लार्क कम टायपिस्ट, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लार्क, सीनियर टाईम कीपर, कमर्शियल अपरेंटिस, स्टेशन मास्तर या पदांसाठी भरती केली जाते.
advertisement
आरआरबी एनटीपीसी भरती परिक्षेसाठी योग्यता
- अंडर ग्रॅज्युएट स्तरावरील पदांसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी वयाची अट 18-30 वर्षे आहे.
-ग्रॅज्युएट लेव्हल पोस्टसाठी ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे.
- SC, ST, OBC प्रवर्ग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते.
- उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. कोणताही रोग नसावा.
किती मिळतो पगार?
आरआरबी एनटीपीसी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि भरती झाल्यानंतर, वेतन पोस्टनुसार बदलते. यामध्ये ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्टला 19,900, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्टला 19 हजार, ज्युनिअर टाइम कीपर आणि ट्रेन क्लार्कला 19,900, कमर्शिअल कम तिकीट क्लार्कला 21,700, ट्रॅफिक असिस्टंटला 25 हजार 500, सीनियर टाइम कीपर, ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, गुड्स गार्ड, सीनियर कमर्शिअल कम तिकीट क्लार्कला 29,200 आणि स्टेशन मास्तर, कमर्शिअल अपरेंटिसला 35,400 रुपये पगार मिळतो.
चार टप्प्यांमध्ये परीक्षा
आरआरबी एनटीपीसीमध्ये उमेदवारांची परीक्षा चार टप्प्यांमध्ये होते.
स्टेज 1- कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा (CBT-1)
स्टेज 2- कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा (CBT-2)
स्टेज 3 - कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्युड टेस्ट / टायपिंग टेस्ट
स्टेज 4- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
आरआरबी एनटीपीसी सीबीटी-1 पॅटर्न
या परिक्षेमध्ये 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातात. गणित आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क या विषयातील प्रत्येकी 30 प्रश्न असतात. तर जनरल अवेअरनेसमधून 40 गुणांचे 40 प्रश्न विचारले जातात. परीक्षा एक तास 30 मिनिटांची असते.
आरआरबी एनटीपीसी सीबीटी-2 परीक्षा पॅटर्न
ही परीक्षा दीड तासाची असते, यामध्ये 120 गुणांचे 120 प्रश्न विचारले जातात. गणित आणि तर्कशास्त्रातून प्रत्येकी 35 गुणांचे प्रश्न असतात. तर जनरल इंटेलिजन्स आणि जनरल अवेअरनेसमध्ये प्रत्येकी 50 गुणांचे 50 प्रश्न असतात.
कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्युड टेस्ट/ टायपिंग
-असिस्टंट स्टेशन मास्तर आणि ट्रॅफिक असिस्टंट या पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्युड टेस्ट असते, ज्याला CBAT म्हणतात.
-ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट आणि सीनियर क्लार्क कम टायपिस्ट, सीनियर टाइम कीपर या पदांसाठी टायपिंग टेस्ट घेतली जाते.