आरोपी भरत सिंह घरासमोर बसून मोठ्याने ओरडून आपला गुन्हा कबूल करत होता आणि शेजाऱ्यांना पोलिसांशी संपर्क साधण्याचा आग्रह करत होता. यानंतर गाझियाबाद पोलिसांनी 55 वर्षीय भरत सिंहला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली. 4 दिवस तो पत्नीच्या मृतदेहासोबत राहिला होता, असं सांगितलं जात आहे. पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह गाझियाबाद येथील राहत्या घरी ठेवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
advertisement
वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेश कुमार यांनी सांगितलं की, शनिवारी 51 वर्षीय सुनीताचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला होता. तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. शेजाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. भरतने पत्नी सुनीताचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना त्याच्या घरी मृतदेह आढळून आला. ही हत्या किमान तीन दिवसांपूर्वी झाल्याचं दिसून येत आहे. आरोपीला अटक केली आहे.
सारखपुडा झाला पण होणारी बायको नीट बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्.. केलं धक्कादायक कृत्य
कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात त्याने पत्नीची हत्या केल्याचं आरोपीने चौकशीत सांगितलं. महिलेच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे, असं पोलीस म्हणाले. एका शेजाऱ्याने उघड केलं, की भरतसिंहने स्वतः आपला गुन्हा कबूल करेपर्यंत त्यांना या गुन्ह्याबद्दल माहिती नव्हती. दुसऱ्या शेजाऱ्याने सांगितलं की, पोलीस येण्याच्या ४-५ दिवस आधीपासूनच महिलेचा मृतदेह घरात होता.
दुसऱ्या शेजाऱ्याने सांगितलं, की तो त्याच्या घराबाहेर बसला होता आणि जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला सांगत होता की त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. तो इथे बसला आणि ओरडला, ‘मी माझ्या बायकोचा खून केला आहे, मला अटक करा.’ म्हणून आम्ही पोलिसांना बोलावलं आणि त्यांना मृतदेह सापडला, असं ते म्हणाले.