TRENDING:

विश्वास संपादन करून कंपनीत मिळवली नियुक्ती; मग श्वेताने केला साडेसहा कोटींचा गेम, मुंबईत धक्कादायक प्रकार

Last Updated:

या प्रकरणी कंपनीची वरिष्ठ लेखापाल श्वेता साटम उर्फ श्वेता साळवी हिच्यासह एकूण 16 जणांविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काळाचौकी परिसरातील एका नामांकित मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीची वरिष्ठ लेखापाल श्वेता साटम उर्फ श्वेता साळवी हिच्यासह एकूण 16 जणांविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

या प्रकरणी सचिन सावंत (वय 55) यांनी तक्रार दाखल केली असून ते संबंधित कंपनीचे संचालक आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत केले होते. ही कंपनी मरिन इंजिनीअरिंग, नॉन-फेरस कास्टिंग तसेच शिपयार्ड आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करते.

Weather Alert : महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, आता उष्णतेचा वाढणार पारा, हवामान खात्याकडून अलर्ट

advertisement

श्वेता साळवी 2024 पासून कंपनीत कार्यरत होती. दीर्घकाळाच्या सेवेमुळे आणि मिळवलेल्या विश्वासामुळे तिची वरिष्ठ लेखापालपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत तिने कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्ण ताबा मिळवला. संचालक कार्यालयात नसताना तिने चेक्स, महत्त्वाची कागदपत्रे, आधार आणि पॅन कार्डची माहिती तसेच मोबाईलवरील ओटीपीचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

advertisement

या माहितीच्या आधारे तिने खासगी सावकार आणि काही गैरबँकिंग वित्त संस्थांकडून सुमारे 3.60 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. 16 सप्टेंबर 2025 रोजी महिंद्रा फायनान्सकडून कर्जाच्या हप्त्याबाबत कंपनीला फोन आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर करण्यात आलेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये एकूण 6.49 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जोतिबाच्या नावानं चांगभल! गुलालाने माखलेला खोबऱ्याचा तुकडा, त्यावरच साकारला दख्खनचा राजा, Video
सर्व पहा

या गुन्ह्यात श्वेता साळवी हिच्यासह भास्कर ठोंबरे, गणेश शिंदे, मीनल जाधव, परेश सुतार, संतोष सुतार तसेच सनदी लेखापाल चंद्रशेखर मोरे आणि त्यांची पत्नी तेजस्विनी मोरे यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अवघ्या 12 महिन्यांत पदाचा गैरवापर करून हा मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस तपासात समोर आला असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
विश्वास संपादन करून कंपनीत मिळवली नियुक्ती; मग श्वेताने केला साडेसहा कोटींचा गेम, मुंबईत धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल