सोमवारची पहाट मात्र त्याच्यासाठी काळ बनून आली. नेहमीप्रमाणे तो वाशी-नंदवाळ मार्गावर धावण्याचा सराव करत होता. अवनी संस्थेजवळ पोहोचताच अचानक त्याच्या छातीत एक तीव्र कळ उठली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तो जमिनीवर कोसळला.
सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी धावपळ करत त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अवघ्या 32 व्या वर्षी एका ध्येयवेड्या तरुणाचा असा अंत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आहे, ज्यांच्या डोळ्यांतील स्वप्नंही त्याच्यासोबतच विझली. त्याच्या या अकाली जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
हे ही वाचा : पीएम कृषी सिंचन योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना काय फायदा होणार?
हे ही वाचा : तो परतलाय, पुन्हा धुवांधार कोसळणार! राज्यात 5 दिवस घालणार थैमान, हवामान खात्यांनं सांगितलं...