तो परतलाय, पुन्हा धुवांधार कोसळणार! राज्यात 5 दिवस घालणार थैमान, हवामान खात्यांनं सांगितलं...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Pune News : राज्यात परतीच्या पावसाची सुरूवात झालेली असून सप्टेंबर महिन्यात पावसाचा आणखी जोर वाढणार आहे. पुढची 5 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि...
Pune News : राज्यात परतीच्या पावसाची सुरूवात झालेली असून सप्टेंबर महिन्यात पावसाचा आणखी जोर वाढणार आहे. पुढची 5 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात थांबलेला पाऊस पुन्हा जोमाने सुरू झालेला आहे. सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाचा काळ सुरू असतो. पण यंदा या पावसाचा जोर वाढला आहे. पुढच्या 24 तासांत या स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुळसधार पावसाची शक्यता आहे.
परतीचा पाऊस लांबणार
जागतिक आणि प्रादेशिक हवामान स्थितीत अनेक बदल होत आहेत, त्याचा परिणाम पावसावर होत आहे. पॅसिफिक महासागरातील 'ला निना' आणि भारतीय महासागरातील निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल या दोन प्रमुख हवामान बदलांचा परिणाम पावसावर होत आहे. त्यामुळे राज्यासह ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
या कारणामुळे परतीच्या पावसावर परिणाम
बदलत्या हवामानाची स्थिती अशीच राहिली तर परतीचा पाऊस उशिरा सुरू होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. सद्यस्थिती आयओडी सलग पाच आठवड्यांपासून निगेटिव्ह आहे, त्याता इंडेक्स -1.2 अंशापर्यंत खाली आला आहे. ही स्थिती 2022 नंतरची सर्वात कमी स्थिती आहे. अशात प्रशांत महासागरातही 'ला निना' दिवसेंदिवस विकसित होत आहे. याचा परिणाम पावसांवर होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबणार आहे.
advertisement
हे ही वाचा : कोल्हापूरच्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी आखला 'रोड मॅप'! 'या' मार्गांवर नो-पार्किंग, वाचा संपूर्ण नियोजन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 12:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तो परतलाय, पुन्हा धुवांधार कोसळणार! राज्यात 5 दिवस घालणार थैमान, हवामान खात्यांनं सांगितलं...