Ratnagiri ST: गणेशभक्तांना लागले परतीचे वेध, लालपरीसह रत्नागिरी विभाग वाहतुकीस सज्ज

Last Updated:

Ratnagiri ST: गौरी-गणपती विसर्जनानंतर कोकणात आलेले बहुतांशी नोकरदार गणेशभक्त मुंबईला परत निघतील.

Ratnagiri ST: गणेशभक्तांना लागले परतीचे वेध, लालपरीसह रत्नागिरी विभाग वाहतुकीस सज्ज
Ratnagiri ST: गणेशभक्तांना लागले परतीचे वेध, लालपरीसह रत्नागिरी विभाग वाहतुकीस सज्ज
रत्नागिरी : कोकणातला गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. या सणासाठी मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमधून लाखो चाकरमानी आपापल्या गावी जातात. सध्या कोकणात गौरी-गणपतीचा सण मोठ्या उत्साहात सुरू असून लवकरच गावी आलेले लोक पुन्हा शहरात परतणार आहेत. गणेशोत्सवानंतर गणेशभक्तांचा परतीचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्यावतीने एसटी आरक्षणाचं आवाहन करण्यात आलं होते. त्याला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला असून आतापर्यंत 21 हजार 139 एसटी बसेसचं बुकींग झालं आहे. त्यामध्ये 1355 बसेसमध्ये वैयक्तीक आरक्षण तर 784 बसेसचे ग्रुप बुकिंग झालं आहे.
दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातून 5 एसटी बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तर 2 सप्टेंबर रोजी 190 रिझर्व्ह आणि 31 ग्रुप बुकींगच्या अशा एकूण 221 एसटी बसेस मुंबईला जातील. रत्नागिरी विभागातून 2 ते 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईकडे एसटी बसेसच्या 21 हजार 139 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्यावतीने कोकणात 5 हजार 200 बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 2950 एसटी बसेस एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. आता गौरी विसर्जनानंतर सात दिवसांच्या बाप्पाचंही विसर्जन होणार आहे. त्यानंतर कोकणात आलेले बहुतांशी नोकरदार गणेशभक्त मुंबईला परत निघतील.
advertisement
दरवर्षीप्रमाणे, यावर्षी देखील राज्यातील एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी विशेष सेवा देण्याची तयारी केली होती. गणेश चतुर्थीनिमित्त कोकणासह विविध जिल्ह्यांमध्ये ज्यादा बस सोडण्यात आल्या होत्या. आता विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर देखील ज्यादा बस गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri ST: गणेशभक्तांना लागले परतीचे वेध, लालपरीसह रत्नागिरी विभाग वाहतुकीस सज्ज
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement